मंगळवार, १४ जुलै, २०२०


प्रत्यक्ष कार्यालयात न येण्याचे
माजी सैनिकांना आवाहन
कोल्हापूर,दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील 50 वर्षावरील सर्व माजी सैनिक/ माजी विधवा व त्यांचे अवलंबित यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष येणे टाळावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाचे काम असल्यास कार्यालयात यावे. अन्यथा अर्ज पोस्टाने अथवा zswo_kolhapur@maharashtra.gov.in  या ई-मेलवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहनही श्री. सासने यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.