मंगळवार, १४ जुलै, २०२०

महाआयुष अंतर्गत 50 वर्षावरील 11 लाख 32 हजार 19 नागरिकांचे सर्व्हेक्षण - जिल्हाधिकारी दौलत देसाई



   कोल्हापूर,दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत  0.032% म्हणजेच 1331 रुग्ण कोरोनाने संसर्गित झाले आहेत. आजअखेर 859 जण बरे झाले आहेत. आज प्रत्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह 440 असून  मृत्यू 32 (2.40 टक्के) आहे. महाआयुष सर्व्हे अंतर्गत जिल्ह्यातील 50 वर्षावरील 11 लाख 32 हजार 19 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
       कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 4147506 इतकी आहे. सध्या 440 रुग्ण ॲक्टिव्ह असून ही टक्केवारी 0.01 टक्के इतकी आहे.  महाआयुष अंतर्गत सर्व्हे केलेले नागरिक 11 लाख 32 हजार 19 (98.69%) प्रत्यक्ष सर्व्हेक्षण- 9 लाख 29 हजार 974 (81.08%). स्थलांतरित- 1 लाख 20 हजार 76 (10.47%) तर  मयत 82 हजार 257 (7.17%), दमा- 19 हजार 972 (2.15%),क्षयरोग- 1 हजार 59 (0.11%), इतर फुफ्फुसांचे आजार- 1 हजार 440 (0.15%), मधुमेह- 1 लाख 23 हजार 782 (13.81%), हृदयरोग-15 हजार 383 (1.65%), मूत्रपिंडाचा आजार - 2 हजार 615 (0.28%), कर्करोग  -1 हजार 954 (0.21%),उच्च रक्तदाब  -3 लाख 19 हजार 42 ( 34.31%) आणि इतर जुनाट आजार -30 हजार 495 (3.28%). अतिजोखीम संख्या 7 हजार 890 (0.8 %), मध्यम जोखीम- 1 लाख 17 हजार 217  (12.61%) कमी जोखमीची संख्या- 8 लाख 4 हजार 319 (86.54%)
          सर्व्हेक्षणात लक्षणे आढळलेले- ताप-1 हजार 545,थकवा-33 हजार 583,  श्वास घेण्यास अडचण-2 हजार 70, अंगदुखी- 44 हजार 145, नाकबंद- 345, वाहणारे नाक- 839, अतिसार- 1 हजार 139 
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.