कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : महिला दिनाचे औचित्य साधत येत्या 8 मार्च 2022 रोजी पर्यटन मंत्री
आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेनुसार दि. 6 ते
10 मार्च या 5 दिवसीय कालावधीत महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळाकडून महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणाऱ्या
महिला अतिथी व त्यांच्या परिवारास निवासकक्ष आरक्षणावर 50 टक्के सूट देण्यात येणार
आहे, असे पर्यटन सचिव वल्सा नायर व व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी कळविले
आहे.
आरक्षणावरील सवलत फक्त रविवार दि. 6 मार्च ते गुरुवार 10 मार्च या
कालावधीसाठीच देण्यात येईल. केवळ निवास कक्ष आरक्षणावर 50 टक्के सवलत असून
त्यानुसार इपी प्लॅन (Only Room) ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपहारगृहांमधील
सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी ही सवलत लागू नाही. महिला दिनानिमित्त
देण्यात येणाऱ्या आरक्षण सवलतीत एखाद्या महिलेने कक्षाचे आरक्षण केल्यास आरक्षण
रद्द करता येणार नाही. तसेच आरक्षण
असणाऱ्या महिलांनी या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.
सर्व पर्यटक निवास व्यवस्थापक यांना माहिती तंत्रज्ञान शाखेद्वारे महिला
अतिथींना 50 टक्के आरक्षण सवलत देण्याकरीता आवश्यक PROMO CODES संकेतस्थळावर (www.mtde.co)
उपलब्ध करुन देण्यात आले आहे. Promo Codes हे महामंडळाद्वारे भाडेतत्वावर देण्यात
आलेल्या पर्यटक निवासासाठी लागू नाहीत. तसेच या सवलती फक्त निवास कक्ष आरक्षणास
वैध असून ज्यादा बेड, कॉन्फरन्स हॉल्स, लॉन्स याकरीता लागू असणार नाहीत.
शासनाने कोरोना बाबतचे निर्बंध शिथिल केले असल्याने महामंडळाची
सर्वच पर्यटक निवासे मोठ्या प्रमाणावर आरक्षित होत आहेत. या उत्साही वातावरणामध्ये
तसेच सवलतींमुळे पर्यटनाचा आनंद द्विगुणीत तर होणार आहेच, पण महामंडळाकडून
रणरागिणींचा सन्मान केला जात असल्याने महिला पर्यटकांमधूनही समाधान व्यक्त होत
असल्याची माहिती महामंडळाचे पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी
दिली आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.