शुक्रवार, ४ मार्च, २०२२

युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सेवारत सैनिकांच्या अवलंबितांना माहिती सादर करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सेवारत सैनिकांच्या अवलंबितांनी (पत्नी/आई/वडील) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बझार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे DAIV (AG's Branch) यांच्याकडे पाठविण्याकरिता समक्ष भेटून माहिती दि. 11 मार्च पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

DAIV (AG's Branch) यांच्याकडील ज्या योजना आहेत त्याअंतर्गत संबधितांचे आवेदन प्राप्त करुन घेऊन रेडीएंट फौंडेशन यांच्याकडील सीएसआर फंडातून आर्थिक मदत देण्याकरिता संबंधितांची माहिती मागविण्यात आली असून संबंधितांनी येताना स्वत:चा मोबाईल नंबर, सैन्य सेवा पुस्तक, ओळख पत्र, पी.पी.ओ. घेवून यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.