सोमवार, ७ मार्च, २०२२

सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत आयकॉनीक सप्ताहाचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका):   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई व सहायक कामगार आयुक्त, यांच्यामार्फत दि. 7 ते 11 मार्च या कालावधीत आयकॉनीक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण तसेच लाभ वाटप यासारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून अनोंदित बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकायक कामगार आयुक्तांनी केले आहे.

            जिल्ह्यातील अनोंदित बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन करण्यात येणार आहे. तसेच मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या शिबीरांचे आयोजन या कार्यालयामार्फत कामगार सुविधा केंद्रामध्ये करण्यात येणार असल्याचेही कामगार आयुक्त कार्यालयामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले  आहे.

00000

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.