सोमवार, १४ मार्च, २०२२

विधानसभा पोटनिवडणूक कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे मतदारसंघाची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या एका जागेकरिता  भारत निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम -

निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक- 17 मार्च 2022 (गुरुवार)

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक-24  मार्च 2022 (गुरुवार)

नामनिर्देशन पत्राची छाननी- 25 मार्च 2022 (शुक्रवार)

उमेदवारी अर्ज माघे घेण्याचा अंतिम दिनांक - 28 मार्च 2022 (सोमवार)

मतदानाचा दिनांक- 12 एप्रिल 2022 (मंगळवार)

मतमोजणी दिनांक- 16 एप्रिल 2022 (शनिवार)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण  करण्याचा दिनांक -18 एप्रिल 2022 (सोमवार)

276 -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघ क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी केले आहे.

0000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.