इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती


कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय डोळयासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राज्यात मेक इन महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवून कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला.  तरुणांना कौशल्य विकासाद्वारे कुशल आणि सक्षम करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान हाती घेतले आहे. या अभियानाव्दारे राज्यात 2022 पर्यंत 4.50 कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन उत्पादनक्षम बनवण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रमास प्राधान्य दिले असून यासाठी राजय ते जिल्हापातळीपर्यंत कौशल्य विकास कार्यकारी समिती कार्यरत आहेत. प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान हे एक सर्वसमावेशक बहुअयामी अभियान असुन या अभियानांतर्गत 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांचे अधिक मागणी असलेल्या क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार व्यावसायिक कौशल्य विकास, कौशल्य वर्धन व पुर्न:कौशल्य विकास करुन त्यांना रोजगारक्षम बनवून त्यातील किमान 75 टक्के उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यास प्राधान्य दिले आहे. शासनाच्या Web : www.mssds.in या वेबपोर्टद्वारे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील कौशल्य विकासाशी संबंधित 600 प्रशिक्षण कोर्सेस आणि त्यासंबधातील सविस्तर माहिती शासनाने वेब पोर्टलवर प्रसिद्ध केलेली आहे.
औद्योगिक क्षेत्राच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा कौशल्य विकास, कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. अनेकदा औद्योगिक संस्थेला विशिष्ट प्रकारच्या कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची आवश्यकता असते हे लक्षात घेऊन उद्योग घटकांना कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले असून असे उद्योग घटक स्वत: त्यांच्याकडील साधनसामुग्री वापरुन प्रशिक्षण बॅच चालू करुन हव्या असलेल्या प्रकारच्या मनुष्यबळाची प्राप्ती करुन घेवू शकतील व स्वत: प्रशिक्षण संस्था म्हणूनही काम करु शकतील. यासाठी शासनाने ILSDP हा उद्योग केंद्रीत कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे. जिल्हा स्तरावर या योजनेची अंमलबजावणी मा. सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येते.
 महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या बेवपोर्टवरुन उमदेवाराच्या नोंदणीपासून मुल्यमापन, समुपदेशन, प्रशिक्षण प्रशिक्षणोत्तर मुल्यमापन, प्रमाणिकरण, रोजगारोपरांत अशा अनेक बाबंीचे सनियंत्रण होणार आहे. हे पोर्टल नोंदणीकृत प्रशिक्षित उमदेवारांसाठी आजीवन करियर व्यवस्थापनाचे व्यसपीठ म्हणून भूमिका बजावेल.  राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी रोजगाराची अधिकत्मक संधी असलेल्या 11 क्षेत्रांची निवड करण्यात आली असून यामध्ये बांधकाम, उत्पादन निर्माण, वस्त्रोद्योग, ऍ़टोमोटीव्ह, आतिथ्य, आरोग्य देखभाल, बॅकिंग, वित्त सेवा विमा, संघटित किरकोळ विक्री, औषधोत्पादन रसायने, माहिती तंत्रज्ञान सलंग्न आणि कृषी प्रक्रिया या क्षेत्रांचा समावेश आहे.   
प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून यासाठी जिल्ह्यातील 70 संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत यावर्षी 2291 विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे देण्यात येत आहेत.             कौशल्य विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर, गारमेंट, सॉफ्ट  किट, इलेक्ट्रीशन, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, वॉर्डबॉय, नर्ससेस, जेम्स ज्वेलरी, संगणक टॅली प्रशिक्षण अशा विविध अभ्यास क्रमांचा समावेश असून ही कौशल्य विकासाची प्रशिक्षणे शासनामार्फत मान्यता देण्यात आलेल्या जवळपास 70 संस्थांमधून विनामुल्य देण्यात येत आहेत. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घेऊन रोजगार स्वंयरोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक जी.ए.सांगडे यांनी केले आहे.
    प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत विविध व्यवसायांचे किमान एक महिन्यापासून 6 ते 7 महिन्यापर्यंत कालावधीची प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात असून यासाठी कौशल्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या कोल्हापूर जिल्हयातील 70 संस्थामार्फत कोशल्य विकासाचे  प्रशिक्षण दिले जात आहे.  या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यास 2600 उमेदवारांना कौशल्य विकासाद्वारे रोजगार स्वंयरोजगारासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे.   
                                               
                                                                                                     एस.आर.माने
-         माहिती अधिकारी,कोल्हापूर
                                                                                                           

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.