इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

पर्यटन स्थळांच्या परिचय सहलीमुळे कोल्हापूर पर्यटन विकासाला नवी चालना मिळेल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी





महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे सभासद लावण्यसंध्या कार्यक्रमाने भरावले
        कोल्हापूर दि. 14 : कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदाकरीता आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची परिचय सहल उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला.
            राज्यातील प्रमुख टुर ऑर्गनायझरर्स असोसिएशनच्या सभासदाकरिता दि. 14 ते 16 ऑक्टोबर 2016 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची सहल आयोजित केली आहे. त्या निमित्ताने  कोल्हापूरच्या मराठमोळ्या कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम शाहू स्मारक भवन हॉल येथे संपन्न झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील, कोल्हापू हॉटेल संघटनेचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर, डॉ. संजय पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या विविध टुर ऑर्गनायझशनचे पदाधिकारी/प्रतिनिधी उपस्थित होते.
            कोल्हापूरात पर्यटनाला मोठा वाव असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची परिचय सहलीमुळे राज्यातील पर्यटन ऑर्गनयझर यांना कोल्हापूरच्या पर्यटनाची आणि सांस्कृतिची ओळख होईल आणि त्यांच्या पर्यटन विषयक संकल्पनाचा कोल्हापूरच्या पर्यटनाला मदत होऊन कोल्हापूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तीन दिवसाच्या या सहलीतून कोल्हापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांकडून पर्यटन विषयक नव-नव्या संकल्पना उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
            महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील या प्रसंगी बोलताना म्हणाले, कोल्हापूरात पर्यटन विकासाला मोठा वाव असून कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला महाराष्ट्र टुर ऑर्गनायझशनचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सहलीसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यातून पर्यटन स्थळांना टुर ऑर्गनायझरर्स असोसिएशनच्या सभासदांनी कोल्हापूरातील पर्यटनाची विपुल माहिती मिळेल. जणेकरुन भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात अधिकाधिक पर्यटन टुर वाढविणे शक्य होईल.
लावण्यसंध्या कार्यक्रमाने असोसिएशनचे सभासद भरावले
            महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या आयोजित केलेल्या सहलीच्या निमित्ताने आज संध्याकाळी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूरच्या मराठमोळ्या कलाकारांचा लावण्यसंध्या सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात कोल्हापूरच्या कलाकारांनी सादर केलेली, लोकगीत, लोकसंगीत, अभंग, भारुड, भुपाळी, जात्यावरच्या ओवी, वासुदेव, लावणी, पोवाडा अशा विविध संस्कृतिक कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित टुर ऑर्गनायझरचे सभासद आणि प्रेक्षक भारावून गेले.  या लावण्यसंध्या कार्यक्रमात पारंपारिक शेतकरी कुटुंबाचे राहणीमान आणि दिनचर्या यावर हा लावण्यसंध्या कार्यक्रम सादर करण्यात आला.
            महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांचे आज सकाळी राज्याच्या विविध जिल्ह्यातून कोल्हापूरात आगमन झाले. वृषाली हॉटेल येथे छोटीखानी सांस्कृतिक कार्यक्रमाने या पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांनी जोतिबा, पन्हाळा, महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणांना भेटी देऊन पर्यटनाची आणि संस्कृतिकची माहिती घेतली. उद्या सकाळी हे महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे सभासद गगनबावडा, राधानगरीधरण, दाजीपूर परिसर आणि धरण बॅक वॉटर, सादळे मादळे या ठिकाणांना भेटी देतील. तर रविवारी सिध्दीनगरी म्युझियम, न्यु पॅलेस म्युझियम, टाऊन हॉल म्युझियम, साठमारी या ठिकाणांना भेटी देतील. नंतर सायंकाळी 4 वाजता शाहू स्मारक भवन येथे प्रशासनाशी संवाद  साधतील.

             प्रारंभी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर यांनी स्वागत केले. आनंत माने यांनी समारंभाचे नियोजन केले. या समारंभास महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे सभासद, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे पदाधिकारी, शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक श्री. हारुगडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह अनेक मान्यवर रसिक आणि नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.