इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

पर्यटनवाढीसाठी पर्यटकांना सवलती देणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील




25 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात कोल्हापूर पर्यटन महोत्सव
कोल्हापूर दि. 16 : जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात मोठ्याप्रमाणात संधी असून पर्यटन वाढले की त्यामध्यमातून जिल्ह्याची श्रीमंती वाढेल त्यासाठी पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने 25 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात कोल्हापूर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या काळात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन खर्चात 50 टक्के सुट देण्यात येईल. पर्यटनासाठी उत्तम प्रतीच्या लक्झरी बसेस उपलब्ध करुन देण्यात येतील त्याचा खर्च शासन देईल. शॉपिंगसाठी सुट रक्कमेचे कुपन त्या कुपनांवर लॉटरी आदी सर्व बाबींचे पॅकेज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घोषित केले.
          कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या प्रेरणेने आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्यावतीने फॅम टुर आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख टुर ऑर्गनायझरर्स असोसिएशनच्या सभासदांना कोल्हापूरच्या वैभवशाली निसर्ग संपन्नतेचा, इतिहासाचा, कलेचा, लोक परंपरेचा परिचय करुन देण्याकरीता ही फॅमिलरायझेशन टुर म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची पर्यटन सहल 14 ते 16 ऑक्टोबर 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी शाहू स्मारक भवन येथे आयोजित परिसंवादात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी, महानगर पालिकचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ कुणाल खेमणार, जेष्ठ विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार, मुख्य वनसंरक्षक श्री राव, महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष प्रभुलाल जोशी, सहसचिव चिमण मोटा, कोल्हापूर हॉटेल मालक अशोसिएशनचे उज्वल नागेशकर, शाहु स्मारक ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          कोल्हापूर श्रीमंत करण्यासाठी पर्यटन क्षेत्राला चालना देणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या नकाशामध्ये कोल्हापूरचा समावेश नसणे ही बाब गंभीर असल्याचे सांगून त्याबाबत तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणारा पर्यटक तीन चार दिवस थांबावा यासाठी शहर आणि जिल्ह्यात चार-पाच पर्यटन स्थळे नव्याने विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशिल असून यामध्ये महापौरांनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी लागणारी नाहरकत प्रमाणपत्रे त्वरीत उपलब्ध करुन द्यावीत. पर्यटन विकासाच्यादृष्टीने गाईडसाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची इत्यंमभुत माहिती देणारा अभ्यासक्रमाची रचना करुन त्यांना प्रशिक्षित केले जाईल. कोल्हापूर पर्यटन महोत्सव 25 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत घेण्यात येणार असून या काळात येणाऱ्या पर्यटकांना टूर खर्चात 50 टक्के सुट देण्यात येईल. टूर ऑपरेटर्सना प्रत्येक पर्यटकामागे चांगला इन्सेटिव्ह देण्यात येईल. पुढील दोन-तीन वर्षे या क्षेत्रात शासन गुंतवणूक करेल आणि पर्यटन क्षेत्राला चालना देईल. त्यांचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर लवकरच एक समिती स्थापन करण्यात येऊन ही समिती पॅकेज, स्थळे, आवश्यक सुविधा यांचा आराखडा तयार करेल.
जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी म्हणाले, कोल्हापूरात पर्यटनवाढीला खुप संधी असून त्याला उभारी देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माहिती व आरक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ते अधिक व्यापक व विकसित करण्यात येईल. शाहु स्मारक भवन पर्यटन व संस्कृतीक हब म्हणून विकसित करण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा परिषदेची मोठ्याप्रमाणावर मदत घेण्यात येईल. त्यांच्या सहाय्याने पर्यटकांसाठी चेंगिंग रुम, शौचालये आदि सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
 महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी कोल्हापूरात पर्यटनाच्या दृष्टीने अनुकुलता असून कोल्हापूर आत्ता जसे आहे तसे ते प्रमोट करायला सुरुवात करा, हे आहे ते घेऊन जगासमोर जा, असे सांगून सध्या कोल्हापूरचे पर्यटन क्षेत्र मार्केटिंगमध्ये कमी पडते, त्यातील त्रुटी व कोल्हापूरला प्रमोटर करण्यासाठी महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशन सर्वोतपरी मदत करेल असे सांगितले. कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी टूररिझम पॉलीसी 2016 ची आखणी करण्यात आली असून तीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दरवर्षी 60 लाख पर्यटक येतात सुमारे सात हजार रुम्स निवासासाठी उपलब्ध असून साठ टक्के पर्यटक जरी निवासी राहिले तरी त्यातून तीनशे ते चारशे कोटी महसूल जमा होतो. रिक्षा, हॉटेल, लॉन्ड्री अदींच्या व्यवसायात वाढ होते. त्यासाठी अधिक चांगले नियोजन आवश्यक आहे.
राज्यात कोल्हापूर चांगले पयर्टनस्थळ असून ते व्यवस्थित प्रमोट होणे आवश्यक आहे. पब्लीक प्रायव्हेट पार्टनशिप विकसित होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आद्यावत होणे, दिशा दर्शक फलक, वाहतुक व्यवस्थापन, गाईड लिस्ट, उत्तम प्रतीची छायाचित्रे, उत्तम दर्जाच्या जाहिराती यांच्या मध्यमातून पर्यटन विकासाला गती देता येईल असेही सुधीर पाटील यांनी सांगितले.
डॉ जयसिंगराव पवार यांनी जिल्ह्याला इतिहासाचा तेजस्वी वारसा आहे. किल्ले, धरणे, वने यामुळे जिल्हा समृध्द आहे. त्याचे व्यवस्थित मार्केंटिग होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वल नागेशकर यांनी केले. सुत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.