मंगळवार, ५ जुलै, २०२२

सायंकाळी 4 वाजेपर्यंत 20 बंधारे पाण्याखाली

 

4 P.M.


          कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 78.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील एकूण 20 बंधारे पाण्याखाली आहेत.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली व शेणवडे असे 20 बंधारे पाण्याखाली आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.