कोल्हापूर,
दि. 1 (जिमाका): कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात सन
2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रकिया सुरु आहे. यामध्ये इयत्ता 7 वी
पासून पुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणाऱ्या
गरजू विद्यार्थ्यांनी (अनुसूचित जाती/ अनुसुचित जमाती/विमुक्त जाती भटक्या जमाती/ इतर
मागासवर्ग व विशेष मागासवर्ग इत्यादी प्रवर्गातील) कार्यालयीन वेळेत मोफत प्रवेश अर्ज
प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वसतिगृहात जमा करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक
साहित्य, जेवण, राहण्याची सोय, सुसज्ज ग्रंथालय, सभागृह, क्रिडांगण, संगणक कक्ष, मनोरंजन
कक्ष, जिम व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, गणवेश भत्ता, सहल भत्ता व स्टेशनरी भत्ता
इत्यादी सुविधा विनामुल्य असणार आहेत. प्रवेशासाठी
व अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुलांचे शासकीय वसतिगृह, कागल येथे (भ्रमणध्वनी
क्र. 9403233217) संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.