विशेष लेख क्रमांक 65 दिनांक.20.नोव्हेंबर 2015
कौशल्य विकासातून कुशल मनुष्यबळ ..
आज कुशल आणि कौशल्ययुक्त पिढी घडविणे क्रमप्राप्त झाले आहे. उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाला फार मोठी मागणी आहे. नेमके हेच इंगित ओळखून राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी उद्योग क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच राज्यात कुशल आणि कौशल्ययुक्त तरुण-तरुणी घडविण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय स्थापन करुन कुशल मनुष्यबळ निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे.
|
महाराष्ट्रात उद्योग येतच नव्हते, त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत्या, आता उद्योजक पुढे सरसावले, असून जगातील अनेक देश महाराष्ट्रात गुंतवणुक करण्यात सक्रीय झाले आहेत. या नवनव्या उद्योगांना कुशल आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात नव्यानेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय स्थापन करुन दरवर्षी जवळपास वीस लाखाहून अधिक कुशल मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न चालविला आहे. राज्यात कौशल्यविकास कार्यक्रमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले असून जिल्हयाजिल्हयात हा कार्यक्रम प्रभावीपणे हाती घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करुन देऊन कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले आहे.
उद्योगांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने स्वयंरोजगार मार्गदर्शन केंन्द्राच्या कामकाजाचा ढाचाच बदलून कौशल्ययुक्त पिढी घडविण्यावर भर दिला आहे, आणि आता या विभागाचं नांवही बदलून ते कोशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभाग केलं आहे, जेणे करुन जिल्हयाजिल्हयातून कोशल्य विकास कार्यक्रमातून नवनवे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. कौशल्य विकास कार्यक्रमाबरोरबच कोशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागामार्फत सातत्यपूर्ण रोजगार मेळावे आयोजित करुन कुशल मनुष्यबळाला रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासही प्राधान्य दिले आहे.
कोशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने यापूर्वी कार्यालयात प्रत्यक्षपणे केली जाणारी सुशिक्षित बरोजगांराची नोंदणी आता ऑनलाईन केली असून कोणीही सुशिक्षित बेरोजगार आता घरबसल्याही आपल्या नावाची नोदंणी ऑनलाईन पध्दतीने करु शकतो. तसेच कोणतीही आस्थापना त्यांना हवे असणारे कुशल, अकुशल मनुष्यबळाची मागणीही ऑनलाईन पध्दतीने करु शकते, असे अनेकविध क्रांतीकारी बदल पूर्वीया रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये करुन काळानुरुप पावले टाकण्याचे काम राज्य शासनाने चालविले आहे. हे सुशिक्षित बेरेाजगार तरुण-तरुणींच्या हिताचेच असल्याने सुशिक्षित बेरेाजगार तरुण-तरुणी आज शासनाच्या आजच्या नांव नोंदणी तसेच कौशल्य विकास कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत आहे.
शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याबरोबरच बेरोजगारीवर उपाय म्हणून स्वयंरोजगाराकडे तरुणांनी वळावे, यासह बेरोजगारीवर मात करण्यासाठीच्या अन्य उपक्रमाबरोबरच सातत्यपूर्ण रोजगार मेळाव्यांचे आयोजन करुन उद्योग, संस्था तसेच विविध आस्थापनाना लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळाची उपलब्धी करुन देण्याचा क्रातीकारी निर्णय राज्य शासनाने घेतल्याने कोल्हापूर सारख्या जिल्हयात गेल्या वर्षभरात अकराशेहुन अधिक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगराच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या, हेच खऱ्या अर्थाने रोजगार मेळाव्याचे यश म्हणावे लागेल.
कोल्हापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्यावतीने कौशल्य विकास कार्यक्रमाबरोबरच रोजगार मेळाव्याना प्राधान्य देण्यात आले असल्याचे या कार्यालयाचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, गेल्या वर्षभरात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे 1100 हून अधिक बेरोजगार युवक, युवतींना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. जिल्ह्यातील विविध उद्योग घटकांमध्ये त्यांची आवश्यकता आणि गरज लक्षात घेवून, कुशल, अकुशल मनुष्यबळ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देवून उद्योजक व बेरोजगार यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून रोजगार मेळाव्याची भुमिका उपयुक्त ठरत आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांना आणि बेराजगारांना एकत्र आणून दोघांचीही गरज पूर्ण करण्याचे काम आज प्रभावीपणे होत आहे. उद्योजकांकडून 8 वी पास, 10 ते 12वी, पदवीधर, आय.टी. आय. डिप्लोमा अशा विविध शिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेवून आवश्यकतेनुसार निवड केली जाते. त्यामुळे त्यांना हवे असणारे मनुष्यबळ या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.
गेल्या वर्षभरात जवळपास 5 रोजगार मेळावे घेण्यात आले असून या रोजगार मेळाव्यांसाठी जिल्ह्यातील जवळपास शंभरच्या आसपास उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील जवळपास 2 हजार रिक्त पदांसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. या रोजगार मेळाव्यामध्ये 1 हजार 331 उमेदवारांनी उपस्थिती नोंदवून उत्फुर्त सहभाग घेतला. यापैकी जवळपास 1 हजार 106 उमेदवारांची विविध उद्योजकांनी निवड केली. हेच या रोजगार मेळाव्याचे फलीत मानावे लागेल.
-
एस.आर.माने
- माहिती अधिकारी, कोल्हापूर.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.