बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रमासाठी
कोल्हापूरसह राज्यातील दहा जिल्ह्यांची निवड
कोल्हापूर, दि. 4 : मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाने 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' हे अभियान दि.21 फेब्रुवारी 2015 पासून सुरु केले आहे. सन 2014 ते 2017 या कालावधीत राज्यातील कोल्हापूरसह दहा जिल्ह्यांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार मुलांमधील लिंगगुणोत्तर खुप कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात राज्यातील कोल्हापूर (863), बीड (807), जळगाव (842), अहमदनगर (852), बुलढाणा (855), औरंगाबाद (858), वाशी (863), उस्मानाबाद (867), सांगली (867), जालना (870) या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. हा कार्यक्रम महिला व बाल विकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. यात केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय हा समन्वय विभाग आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात महिला आणि बाल विकास विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा आरोग्य, शिक्षण, आदिवासी विभाग, ग्रामविकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विकास, माहिती व जनसंपर्क विभाग यांनी हा आराखडा राबवायचा आहे. या कार्यक्रमासाठी 100 टक्के अनुदान केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे.
सदर योजना राबविण्यासाठी प्रधान सचिव महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर मार्गदर्शन व संनियंत्रण करण्यासाठी 'सुकाणू समिती' गठीत करण्यात आली आहे. तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. यांच्या समितीने निवड झालेल्या 10 जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन करावे, जिल्हास्तरावर पीसीपीएनडीटी संबंधी टास्कफोर्स जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करावी. या टास्कफोर्सने जिल्ह्यात बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रम राबविण्यासंबंधी मार्गदर्शन करावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.
सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेताक 201510311032063430 असा आहे.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.