कोल्हापूरची कला, संस्कृती तसेच मर्दानी खेळाच्या कार्यक्रमांनी
अतिरिक्त मुख्य सचिवांसह परदेशी पर्यटकही भारावले
कोल्हापूर, दि. 11 : कोल्हापूरची कला, संस्कृती विशेषत: मर्दानी खेळांच्या बहारदार कार्यक्रमांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्यासह देश तसेच परदेशी पर्यटकही भारावून गेले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आज कोल्हापूरात डेक्कन ओडीसी या शाही रेल्वेचे आगमन झाले. या शाही रेल्वेमध्ये राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी तसेच देश आणि विदेशातील पर्यटक पाहूण्यांचेही आगमन झाले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महालक्ष्मी मंदीर, भवानी मंडप, न्यु पॅलेस, शालिनी पॅलेस, राजर्षी शाहू जन्मस्थळ, पापाची तिकटी अशा शहरातील अन्य पर्यटन तसेच तिर्थक्षेत्रांना भेटी देऊन येथील कला, संस्कृती, सांस्कृतिक परंपरा जाणून घेतली व तसेच पर्यटन स्थळे आणि तिर्थक्षेत्रांचीही माहिती घेतली. साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचे दर्शनही राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आंनद कुलकर्णी यांनी घेतले . त्यानंतर सायंकाळी ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये खंडोबा- वेताळमाळ तालमीच्या वतीने वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या मर्दानी खेळांचाही राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्यासह देश तसेच परदेशी पर्यटकांनीही मनमुराद आनंद घेतला आणि मर्दानी खेळांना दाद दिली. यावेळी मर्दानी खेळामध्ये विठा, पट्टा, लाठी, लिंबु मारणे, विठाफेक आदी खेळांमधील कला बहारदारपणे सादर केल्या. यावेळी परदेशी पर्यटकाबरोबरच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, त्यांच्या पत्नी अंशु अमित सैनी, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, त्यंाच्या पत्नी श्रध्दा जोशी-शर्मा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, अमरजा निंबाळकर आदी मान्यवर आणि पर्यटक उपस्थित होते.
कोल्हापूरला कला, संस्कृती, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशी मोठी परंपरा लाभली असून निसर्ग, पर्यटन आणि तिर्थ क्षेत्रांची कोल्हापूरला देण आहे. कोल्हापूरची कला, संस्कृती, ऐतिहासिक परंपरा, पर्यटन स्थळे, तिर्थक्षेत्रे आणि येथील सांस्कृतिक रिती रिवाज देशातील पर्यटकांबरोबरच परदेशातील पर्यटकांपर्यंत पोहचण्यास डेक्कन ओडीसी शाही रेल्वेचा उपक्रम उपयुक्त आणि स्तुत्य असल्याचे मत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी,
व्यक्त केले. आणि मर्दानी खेळामध्ये सहभागी झालेल्या तरुण तरुणींचा तसेच बाल कलाकरांचाही त्यांनी सत्कार करुन त्यांचे मुक्त कंठानी कौतुक केले.
00 0 00 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.