शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५


पहिले पाऊल वचनपूर्तीचे या घडीपत्रिकेचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर दि. 6: शासनाच्या वर्षपूर्ती निमित्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या  पहिले पाऊस वचनपूर्तीचे या विकास विषयक योजनांवर आधारित घडीपत्रिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आले.
गडहिंग्लज येथे  केंद्र शासनाचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लोक माहिती अभियान आणि महाराजस्व अभियांन कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष राजेश बोरगावे, गडहिंग्लजच्या पंचायत समितीचे सभापती अनुसया सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.
पहिले पाऊल वचनपूर्तीचे या घडीपत्रिकेमध्ये शासनाने गेल्या वर्षभरात राबविलेल्या काही प्रमुख योजनांची सचित्र माहिती देण्यात आली असून, ही घडीपत्रिका शासनाच्या योजना आणि उपक्रम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास उपयुक्त ठरेल असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या घडीपत्रिकेमध्ये जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान, जिल्हा प्रशासनाची ई डिस्नीक प्रणाली, स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास, महाराजस्व अभियान, सामाजिक न्याय, सहकारात ई प्रणाली, वार्षिक योजना आराखडा, रस्ते विकास, क्रीडा विकास अशा विविध योजनांची संक्षीप्त माहिती देण्यात आली आहे.
पहिले पाऊल वचनपूर्तीचे या घडीपत्रिकेच्या माध्यमातून शासनाच्या विकास योजना गावागावापर्यंत पोहाचण्यास निश्चितपणे मदत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
या घडीपुस्तिकेच्या प्रकाशन सोहळयास जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी एस. आर. माने यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.