व्यंगचित्र समाज प्रबोधनाचे महत्वपूर्ण माध्यम
-व्यंगचित्रकार विजय टिपुगडे
राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात संपन्न
कोल्हापूर, दि. 19 :
व्यंगचित्र कलेतून व्यक्त होणारी अभिव्यक्ती ही शब्दापेक्षा मार्मिक ठरत असून व्यंगचित्र आणि अर्कचित्र हे खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचे महत्वपूर्ण माध्यम असल्याचे प्रतिपादन जेष्ठ चित्रकार आणि व्यंगचित्रकार विजय टिपुगडे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून व्यंगचित्र व अर्कचित्र कलेचे महत्व आणि प्रभाव या विषयावरील व्याख्यानात व्यंगचित्रकार विजय टिपुगडे बोलत होते. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक वर्षा शेडगे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
व्यंगचित्र कला ही समाजमन घडविणारी महत्वपूर्ण कला असल्याचे स्पष्ट करुन व्यंगचित्रकार विजय टिपुगडे म्हणाले, समाजातील चालू घडामोडीवर प्रकाश टाकण्याचं काम व्यंगचित्रातून होते. समाजातील चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्याबरोबरच चुकीच्या गोष्टींना फटके लगावण्याचे कामही व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रभावशाली होत आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही वृत्तपत्रांबरोबरच व्यंगचित्रे हे कार्टूनच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही पुढे येत असून या क्षेत्रात करियर घडविण्याचे मोठी संधी निर्माण होत आहे, असेही ते म्हणाले.
अनेक शब्दांचे काम व्यंगचित्राच्या एका कलाकृतीतून होत असून समाजावर अंकुश ठेवण्याचं कामही व्यंगचित्रातून होत असल्याचे स्पष्ट करुन व्यंगचित्रकार विजय टिपुगडे म्हणाले, व्यंगचित्रकला अधुनिक काळातही समाज प्रबोधनाचे आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम व्हावे यासाठी व्यंगचित्र केलेला सर्वांनीच प्रोत्साहन आणि पाटबळ देणे गर्जचे आहे. व्यंगचित्र कला समाजासमोर व्यापक स्वरुपात यावी तीचे महत्व आणि व्यप्ती वाढतच रहावी यासाठी सकारात्मक समाजमन तयारी व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
व्यंगचित्रामध्ये कमीत कमी रेषांमध्ये प्रभावी मांडणी महत्वाची असून त्यासाठी शरीर शास्त्राचा, समाज मनाचा अभ्यास, प्रमाणबध्द रचना आणि वास्तववादी प्रसंगाची जाण व्यंगचित्र बोलके करण्यास मदत करते. विजय टिपुगडे यांनी व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, एम.एफ.हुसेन यांना व्यक्ती चित्रकलेने मोठी ओळख करुन दिल्याचा दाखलाही त्यांनी दिला. कोल्हापुरातील व्यंगचित्र कलेचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला. भविष्यात व्यंगचित्र कलेची दालने उभी रहावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत करुन राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व विषद केले. माहिती अधिकारी एस.आर.माने यांनी समारंभाचे सुत्रसंचालन आणि आभार मानले. या समारंभास शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, महापालिकेचे नगर सचिव उमेश रणदिवे, सहायक आयुक्त संजय भोसले, विविध वृत्तपत्रांचे संपादक, वृत्तपत्र प्रतिनिधी तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रमुख, कॅमेरामन, छायाचित्रकार उपस्थित होते.
0 0 00 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.