कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
योजनेंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या मागासवर्गीय
विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी
शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त
विशाल लोंढे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी
14 डिसेंबर 2021 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अद्यापही ज्या मागासवर्गीय
विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी
शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी व सन 2020-21 वर्षामधील
अर्जांचे नुतनीकरणासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित असणारे
अर्ज छाननी करुन लवकरात-लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे
वर्ग करावेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.