शुक्रवार, ३ जून, २०२२

शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेतील पुरुष गटात शशिकांत बोगांर्डे तर महिला गटात नंदिनी साळुंखे विजयी घोषित




  








         कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व' अनुषंगाने आयोजित खुल्या गटातील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात शशिकांत चंद्रकांत बोगांर्डे तर महिला गटात नंदिनी बाजीराव साळुंखे यांना विजयी घोषित करण्यात आले. 

           मोतीबाग तालीम येथे स्पर्धेतील अंतिम कुस्ती स्पर्धा आमदार जयश्री जाधव व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना आमदार जयश्री जाधव व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करुन गौरविण्यात आले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्यासह क्रीडा विभागाचे सचिन चव्हाण, सुधाकर जमादार, प्रविण कोंडावळे, बालाजी बरबडे, रोहिणी मोकाशी, मंदाकिनी पवार, साताप्पा पाटील, संदीप जाधव व सौरभ खामकर आणि  प्रयोजक कंपनीचे कमल मिश्रा, शैलेश सरनोबत व भैरु मुटगेकर यांच्यासह कुस्तीप्रेमी उपस्थित होते.           

            दि. 1 ते 3 जून 2022 कालावधीत या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. फ्री स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट जिल्हास्तरीय मुले 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 अशा 9 वजनी गटामध्ये स्पर्धा नॉकऑऊट पध्दतीने घेण्यात आल्या. प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक रु. 10 हजार, व्दितीय रु.7 हजार व  तृतीय रु.5 हजार तर खुल्या गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांक रु. 75 हजार,  व्दितीय रु.50 हजार व  तृतीय रु.25 हजार प्रमाणपत्र व शिल्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कुस्ती स्पर्धा निकाल-

57 किलो वजनी गटात सुदर्शन भारत पाटील, म्हाकवे (प्रथम), विनायक विष्णू रावण, वाघुर्डे (व्दितीय) आणि प्रविण कृष्णात वडगावकर, शेंडूर (तृतीय)

61 किलो वजनी गटात अतुल भिमराव चेचर, पोर्ले (प्रथम), करणसिंह प्रकाश देसाई, भामटे (व्दितीय) आणि प्रतिक नामदेव साळुंखे, यवलूज (तृतीय)

65 किलो वजनी गटात कुलदीप बापूसो पाटील, राशिवडे (प्रथम), अनुप आनंदा पाटील, क्रीडाप्रबोधिनी (व्दितीय) आणि ओंकार दिलीप लंबे, बानगे (तृतीय)

70 किलो वजनी गटात आकाश प्रभाकर कापडे, आनूर (प्रथम), निलेश आब्बास हिरुगडे, बानगे (व्दितीय) आणि किशोर अशोक पाटील, राशिवडे (तृतीय)

74 किलो वजनी गटात सौरभ अशोक पाटील, राशिवडे, (प्रथम), साताप्पा जयसिंग हिरुगडे, बानगे, (व्दितीय) आणि श्रेयस राहुल गाठ, हुपरी (तृतीय)

79 किलो वजनी गटात प्रतिक पंडित म्हेतर, राशिवडे (प्रथम), प्रविण बाजीराव पाटील, चाफोडी (व्दितीय) आणि शुभम हिंदुराव कोळेकर, कोगील (तृतीय)

86 किलो वजनी गटात ऋषिकेश उत्तम पाटील, बानगे (प्रथम), भगतसिंग सुर्यकांत खोत, माळवाडी (व्दितीय) आणि किरण शिवाजी पाटील, इस्पुर्ली (तृतीय)

92 किलो वजनी गटात अतुल आनंदा डावरे, बानगे (प्रथम), संकेत विठ्ठल गायकवाड, राशिवडे (व्दितीय) आणि शुभम हिंदुराव पाटील, कोगे (तृतीय)

97 किलो वजनी गटात बाबासाहेब आनंदा रानगे, आरे (प्रथम), सनिकेत मधुकर राऊत, पडळ (व्दितीय) आणि शंकर बाजीराव चौगले, अर्जूनवाड (तृतीय)

खुला गट (महिला) नंदिनी बाजीराव साळुंखे, मुरगुड (प्रथम) स्मिता संभाजी पाटील, आमशी (व्दितीय) आणि सृष्टी जयवंत भोसले, बिद्री (तृतीय)

खुला गट (पुरुष) शशिंकांत चंद्रकांत बोगांर्डे, बानगे (प्रथम) अरुण विजय बोगांर्डे, बानगे (व्दितीय) आणि तुषार खाशाबा ठोंबरे, शाहुपुरी (तृतीय)

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.