कोल्हापूर, दि. 5 (जिमाका):-भारत सरकार वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय
बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि. 6 ते 12 जून 2022 हा सप्ताह
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या “ग्राहक जनसंपर्क
अभियान” अंतर्गत “आइकॉनिक सप्ताह“ म्हणून साजरा
करण्यात येणार आहे.
या सप्ताहाअंतर्गत
कोल्हापुर शहरामध्ये सर्व बँकेच्या सक्रिय सहभागातून अग्रणी जिल्हा कार्यालय, कोल्हापुर
यांच्या वतीने दि. 8 जून रोजी सकाळी 10.30 ते 2.00 वाजेपर्यंत “क्रेडीट
ऑउटरिच कॅम्प”चे ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात
आले आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व बँक व इतर शासकीय विभागाचे पदाधिकारी उपस्थित
राहणार आहेत.
मेळाव्यामध्ये
आलेल्या व्यक्तींना बँकेच्या विविध योजनांची माहिती देणे व लाभार्थीना मंजुरीपत्र वाटप
करणे, आर्थिक साक्षरता समुपदेशन, विविध जनसुरक्षा योजनांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या
शाखा, व्यवसाय समन्वयक (BC), अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कृत करणे इत्यादीचे प्रयोजन
आहे. मेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक
गणेश गोडसे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.