इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २४ जून, २०२२

बेरोजगार सहकारी संस्थानी कामासाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 


 

            कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): बेरोजगार सहकारी संस्थांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, कार्यालय येथे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी दोन परिचर/हमाल रू.12 हजार 500 प्रतिमहा प्रत्येकी व जिल्हा शल्य चिकीत्सक ,रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्र,सी.पी.आर. येथे एक सफाई कामगार 11 महिन्यासाठी रू. 6 हजार 875 प्रतिमहा याप्रमाणे कामे प्राप्त झाली आहेत. कामे करवीर तालुक्यातील असल्याने करवीर तालुक्यातील इच्छुक व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्रासह दि.  30 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

           

अटी व शर्ती - बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रू. 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव   दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.

            सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2018-19, 2019-20, 2020-21 चे लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्र देणे आवश्यक असून ते क्रियाशील  सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे या सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती/प्रमाणपत्र मूळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज/प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.