शुक्रवार, ३ जून, २०२२

ब्लॅक ॲस्ट्रोलार्प जातीच्या पिल्लांसाठी संपर्क करण्याचे आवाहन

 

 

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र या प्रक्षेत्रावर आठवड्याच्या दर गुरुवारी सुधारित एक दिवशीय ब्लॅक ॲस्ट्रोलार्प या जातीच्या पिल्लांची नियमितपणे निर्मिती होत आहे. या एक दिवशीय मिश्र पिल्लांची किंमत रु. 20 प्रति नग आहे. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक कोरोगेटेड चिक बॉक्स किंमत रु. 50 प्रति बॉक्स आहे. इच्छुक पशुपालकांनी सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त  डॉ. प्रवीण नाईक यांनी केले आहे.

       अधिक माहितीसाठी ई-मेल chkolkhapur@gmail.com व 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.