शुक्रवार, २४ जून, २०२२

वैद्यकीय उपकरणे उत्पादनासाठी परवाना घेणे बंधनकारक अन्न व औषध प्रशासनाचे अवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): वैद्यकीय उपकरणे उत्पादनासाठी जिल्ह्यातील उत्पादकांनी परवाना प्राप्त करण्यासाठी त्वरीत www.odsapnaonline.gov.in या सुगम पोर्टलवर अर्ज करुन दि. 1 ऑक्टोबर पूर्वी परवाना प्राप्त करुन घ्यावा. परवाने प्राप्त करताना काही अडचणी आल्यास अन्न व औषध प्रशासन, कार्यालयाशी संपर्क साधावा. दि. 1 ऑक्टोबर नंतर ज्या वैद्यकीय उपकरणे उत्पादकांकडे परवाने नसतील त्यांच्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व मेडीकल डिव्हाईसेस नियम 2017 अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अ.क.ठाकरे कळविले आहे.

सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याव्दारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर दि. 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. दि. 1 ऑक्टोबर पासून सर्व वैद्यकीय उपकरण उत्पादकांनी परवाना धारण करुन त्यानंतरच उत्पादन व विक्री करणे बंधनकारक आहे

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.