शुक्रवार, ३ जून, २०२२

‘शिवशक राजदंड स्वराज्यगुढी’ उभारणी कार्यक्रम सोमवारी

 


 

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): 6 जून हा शिवस्वराज्य दिन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सोमवार दि. 6 जून रोजी ‘शिवशक राजदंड स्वराज्यगुढी’ उभारणीचा कार्यक्रम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलकर हाऊसच्या प्रांगणात सकाळी 7 वाजता उभी केली जाणार आहे.

कार्यक्रमास खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजू (बाबा) आवळे, ऋतुराज पाटील व श्रीमती जयश्री जाधव तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.

000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.