इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १९ जून, २०२३

जी 20 परिषद : रन फॉर एज्युकेशन रॅलीजचे कोल्हापूर येथे आयोजन

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : सन 2023-24 चे G20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असून त्या अनुषंगाने विविध विषयांवर जी20 परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जी20 परिषद पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संदर्भात राष्ट्रीय कार्यक्रमासाठी रन फॉर एज्युकेशन रॅलीज चे कोल्हापूर येथे दि. 20 जून 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

रन फॉर एज्युकेशन रॅली शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे. या रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग व जिल्हा स्तरावरील विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणारे खेळाडू, विविध कार्यक्षेत्रातील नामांकित व्यक्ती, एनजीओ, पालक, शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या रॅलीकरीता सर्व सहभागी  दि. 20 जून 2023 रोजी सकाळी 6.45 वाजता बिंदू चौक कोल्हापूर येथे एकत्र येतील. बिंदू चौकातून सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष रॅलीला सुरूवात होईल. या  रॅलीचा मार्ग बिंदू चौक-शिवाजी पुतळा-महानगरपालिका-सीपीआर-दसरा चौक आणि मुस्लिम बोर्डिंग असा असणार आहे. रॅलीमध्ये इयत्ता आठवी व नववीमधील 500 विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांबरोबर संबंधित शाळेतील क्रीडा शिक्षक, महिला शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सहभाग असणार आहे. या रॅलीच्या नियोजनाकरीता शिक्षण उपसंचालक कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्राचार्य डाएट, शिक्षणाधिकारी  (प्राथ., माध्य., योजना) उपस्थित होते.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.