कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृह, माजी सैनिक
विश्रामगृह व महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी
पध्दतीने अशासकीय पदे भरावयाची आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज 13 जून 2023 पर्यंत जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जाम करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.
वसतीगृहात भरावयाची पदे खालीलप्रमाणे- अधीक्षक
(पुरुष)- 01, सैनिकी मुलांचे वसतीगृह, कोल्हापूर येथे मानधन 29 हजार 835 रु. सहायक
अधिक्षीका (महिला)- सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर - 01, मानधन 23 हजार 283 रु.
स्वयंपाकी (महिला)- सैनिकी मुलांचे वसतीगृह, कोल्हापूर - 05, मानधन 12 हजार 962 रु.
स्वयंपाकी (महिला)- सैनिकी मुलींचे वसतीगृह,
कोल्हापूर -05 जागा 12 हजार 962 रु. मानधन. माळी (पुरुष)- सैनिकी मुलींचे वसतीगृह,
कोल्हापूर -01, मानधन 12 हजार 127 रु. पहारेकरी (पुरुष)-सैनिकी मुलींचे वसतीगृह, कोल्हापूर-
01, मानधन 19 हजार 443 रु. सफाई कामगार (पुरुष)- माजी सैनिक विश्रामगृह, कोल्हापूर-
01, मानधन 12 हजार 127 रु. पहारेकरी (पुरुष)- महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर - 01 जागा,
मानधन 13 हजार रु. याप्रमाणे आहे.
प्राप्त
अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची मुलाखत दि. 14 जून रोजी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, कोल्हापूर येथे सकाळी 11 वाजता घेण्यात येईल. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही ले. कर्नल माने
यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.