कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे रविवार दिनांक 11 जून, 2023 रोजी तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर
येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या
रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 12 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून
विविध प्रकारची सुमारे 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्त पदे या
मेळाव्याकरिता कळविण्यात आली आहेत. या
पदांकरीता किमान 8 वी, 9 वी उत्तीर्णांसह, 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर
अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी
पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र
असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन
नोंदविणे आवश्यक आहे. उमेदवारांनी
प्रत्यक्ष मुलाखतीला येताना बायोडाटा 5 प्रतीत आणणे आवश्यक
आहे. तसेच विभागाच्या वेबपार्टलवरील रोजगार व स्वयंरोजगाराच्या
विविध योंजनांचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छुक म्हणून नोंदणी (एम्प्लॉयमेंट कार्ड) साठी आपली
सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्डच्या
छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक असल्याचेही श्री. माळी यांनी
कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.