शुक्रवार, ९ जून, २०२३

बेरोजगार सहकारी संस्थेमार्फत सेवा देण्याची संधी

 


 

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यात एनएचएम अंतर्गत आरोग्यवर्धिनींनी केंद्रासाठी कंत्राटी सफाई कामगार पुरवठा करण्याच्या सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एनएचएम जिल्हा परिषद कोल्हापूर, नगरपालिका क्षेत्रात 16 व महानगरपालिका क्षेत्रात 12 असे एकूण 28 आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी कंत्राटी सफाई कामगार पुरवठा करण्याऱ्या सेवा सहकारी संस्थांनी सफाई कामगार पुरविल्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र व अपूर्ण लेखापरिक्षण अहवाल तसेच इच्छापत्रासह प्रस्ताव दिनांक 12 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी  यांनी केले आहे.

 

अटी व शर्ती -

बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटीची स्थापना ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाख रुपयांपर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव   दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2020-21, 2021-22, 2022-23 च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्र देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे सहकारी सेवा सोसायटीतून कमी करुन त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती, प्रमाणपत्र मूळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ही कामे कोल्हापूर जिल्ह्यातील असून या कामासाठी तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कार्यरत 

  संस्थांनी अर्ज, प्रस्ताव सादर करावेत. अर्ज, प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये. संस्थांचा शासकीय व खासगी सफाई कामगार पुरविल्याबाबतचा अनुभव असणे आवश्यक आहे. ओपीडी अंतर्गत काम करण्याचा अनुभव असलेला सफाई कामगार संस्थेमार्फत उपलब्ध करा. ओपीडी मधील व बाहेरील स्वच्छतेचे कामकाज पहावे. सफाई कामगारांनी टॉयलेट, बाथरुम व दवाखान्यामधील साफसफाई गुणवत्ता, आश्वासक मार्गदर्शक सूचनेनुसार करावी. बायोमेडिकल वेस्ट अंतर्गत कलर कोडनुसार जैविक व अजैविक साहित्यांचे वर्गीकरण करुन व्यवस्थित विल्हेवाट करावी व नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी. कार्यालयीन स्वच्छतेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व कामकाज पहाणे आवश्यक आहे.

वरील अटी पूर्ण करणा-या कार्यरत सेवा सहकारी संस्थांनी आपल्या इच्छापत्रासह प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 12 जून 2023 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात सादर करावेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.