कोल्हापूर, दि. 9
(जिमाका) : पुणे विभागीय स्तरावरील माहे जूनचा विभागीय महिला
लोकशाही दिन सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी
11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे,
अशी माहिती महिला व बाल विकास विभागाचे सदस्य सचिव तथा विभागीय उप आयुक्त संजय
माने यांनी दिली आहे.
समस्याग्रस्त व पिडीत
महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे
संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची
शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच या महिलांना सुलभ मार्गदर्शन व्हावे
यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात
येत आहे.
महिला लोकशाही दिनी
महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, अडचणी यावर संबंधित विभागाचे अहवाल, त्याबद्दलचे
नियम, शासनाची भूमिका यांचा विचार करुन महिला लोकशाही दिनानंतर कमाल एक
महिन्याच्या आत अर्जदाराला देण्याची तरतूद शासन निर्णयात केली आहे. विभागीय महिला
लोकशाही दिनाचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय कार्यालयात
आयोजित करण्यात येतो.
महिला लोकशाही दिनासाठी
तक्रार व अडचणी अर्ज देण्याकरीता खालील निकष देण्यात आले आहेत.
अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार
/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तक्रार अर्ज २ प्रतीत असावा.
खालील विषयांवरील तक्रार अर्जाचा महिला लोकशाही दिनी
कार्यक्रमात विचार करण्यात येणार नसून असे अर्ज सुध्दा स्विकारले जाणार नाहीत.
विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या
कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापनाविषयक बाबी, तक्रार / निवेदन वैयक्तिक
स्वरुपाचे नसेल तर महिला लोकशाही
दिनासाठी प्राप्त होणारे तक्रार अर्ज स्विकारल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित
तक्रार आहे त्या विभाग प्रमुखाकडे तक्रार अर्ज पाठविण्यात येणार असुन संबंधित
विभाग प्रमुख हे या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह महिला लोकशाही दिनी
उपस्थित राहणार आहेत. अर्जदारास महिला लोकशाही दिनानंतर कमाल एक महिन्याच्या आत
अंतिम उत्तर दिले जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत विहित नमुन्यात अर्ज नसल्यास
असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही
दिनासाठीचे तक्रार, निवेदन अर्ज
विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास पुणे विभाग पुणे, पोलीस आयुक्तालय शेजारी, 3
चर्च रोड पुणे 411001 या पत्यावर स्वीकारण्यात येणार आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.