कोल्हापूर दि. ४ :
जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणी करुन स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी व्यापक तपासणी
मोहिम राबवणार असून यासाठी स्वंयसेवी संघटना, प्रशासकीय यंत्रणा, कोल्हापूर
महानगरपालिका, पोलिस, प्रशासन यांच्यात
समन्वय होण्यासाठी एक समिती नियुक्त करणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी
आप्पासाहेब धुळाज यांनी आज सांगितले.
या बैठकीय पोलीस
उपअधीक्षक संजय जाधव, जिल्हा-शल्यचिकित्सक
डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि
महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुनंदा नाईक आणि स्वयंसेवी संघटनांचे
पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. धुळाज यांनी सांगितले की, पी. सी. पी. एन.
डी. टी ( प्री कन्सेप्शन प्री नाताल डायग्नोस्टीक टेक्निक) आणि एम. टी. पी.
(मेडीकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नसी) या दोन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी
सर्व संबंधित घटकांनी समन्वय ठेवण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील गर्भलिंग निदान
केंद्गाची तपासणी मोहिम व्यापक केली जाणार आहे. ही मोहिम प्रभावी होण्साठी सर्व
संबंधित घटकांत समन्वय आवश्यक आहे. हा समन्वय होण्यासाठी डॉक्टर, शासकीय अधिकारी आणि
स्वंयसेवी संघटनांचे पदाधिकारी यांची समिती नियुक्त केली जाईल. सध्या दाखल करण्यात
आलेल्या खटल्याबद्दल काय कारवाई करावी यांचे पोलिस विभागाला मार्गदर्शन करण्यासाठी
विधी विषयक सेवा उपलब्ध करुन दिली जाईल.
पी. सी. पी. एन. डी. टी. कायद्याच्या
अंमलबजावणीसाठी कोल्हापूर शहरात महानगरपालिका, जिल्ह्यातील
नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात त्या त्या नगर पालिकांचे मुख्याधिकारी कार्यवाही
करतील. तर मेडीकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नसी साठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यवाही
करतील, असे ही श्री. धुळाज
यांनी स्पष्ट केले.
पी. सी. पी. एन.
डी. टी. कायद्यातील तरतुदीनुसार डॉ. शिवाजी माने, डॉ. गजानन कोळी आणि
डॉ. बी. एच. काटकर यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. एल. एस. पाटील यांनी सांगितले. गर्भलिंग निदान करीत असल्यास त्याबद्दलची
माहिती १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी, असेही त्यांनी
यावेळी सांगितले. गर्भलिंग करणार्या डॉक्टरांची माहिती देणार्यास रोख बक्षिसही
देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ए. एस.
यादव, डॉ. ए. एस. यादव, डॉ. मुकुंद सादिगले, औषध निरीक्षक आ. आ.
रासकर, रेडिओलॉजिस्ट
संघटनेचे अध्यक्ष सुनील कुबेर, स्त्री रोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा सौ. भारती अभ्यंकर , उपाध्यक्ष मिलींद
पिशवीकर, स्वयंसेवी
संघटनांचे प्रतिनिधी तनुजा शिपुरकर, उदय नारकर, सुवर्णा तळेकर, सुरेखा राजेशिर्के, माया प्रकाश रणवरे
आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.