कोल्हापूर दि. २ :
जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात विविध विभागांशी
संबंधित एकूण ७६अर्ज दाखल झाले असून त्यापैकी सर्वांधिक ३७ अर्ज महसूल विभागाचे
आहेत.
आज दाखल झालेल्या ७६
अर्जापैकी १२ अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाशी निगडीत आहेत. जिल्हा परिषदेशी निगडीत
९, उपनिबंधक कार्यालयाचे १२, अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे ३, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध
प्रशासन, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र
राज्य विद्युत विभाग यांच्याशी निगडीत प्रत्येकी एक अर्ज दाखला झाला आहे. जून २०१२ अखेर दाखल झालेल्या एकूण १९३
अर्जापैकी आजअखेर ९८ अर्ज अर्ज निकाली
काढण्यात आले असून ९५ अर्ज प्रलंबित आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.