शनिवार, ७ जुलै, २०१२

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना धनादेश वितरणासाठी शिबीरांचे आयोजन


कोल्हापूर दि. ६ : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयाकडून सन २०११-२०१२ मधील प्राप्त प्रस्तावामधील प्रवर्ग व योजना निहाय उपलब्ध तरतूरदीप्रमाणे मंजूर झालेल्या शिष्यवृत्ती रक्कमेच्या धनाकर्षाचे वाटपाबाबत तालुकानिहाय कँम्पचे दि. १६ जुलै २०१२ ते २३ जुलै २०१२ पर्यंत आयोजीत करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व शासन मान्यता प्राप्त माध्यमिक व प्राथमिक शाळेतील केंद्गप्रमुख/ मुख्याध्यापकांनी संबंधित तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिबीराचे ठिकाण, तारीख व धनाकर्ष स्वीकारणेसाठी आवश्यक सुचनांची माहिती घ्यावी. संबंधितांनी परिपूर्ण शिष्यवृत्ती प्रस्तावासह शिबीराच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकार्‍यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.