कोल्हापूर दि. ६ :
जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवांना कळविणेत येते की, मा. संचालक, सैनिक कल्याण विभाग
महाराष्ट्र राज्य पुणे द्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजनांतर्गत
निर्णय घेतले जातात. या मध्ये मुख्यत्वेकरुन माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक
आर्थिक मदती, परराज्यामध्ये
शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना आर्थिक मदती, स्वयंरोजगारासाठी
आर्थिक मदत, माजी सैनिक व
अवलंबितांना विशेष कामगिरीबाबत गौरव पुरस्कार, पाल्यांना विविध
शैक्षणिक संस्थामधून प्रवेशासाठी आरक्षण, ध्वजदिन निधी संकलन, कुटुंब निवत्ती
वेतन माजी सैनिकांचे नोकरीद्वारे पुनर्वसन इ. बाबत महत्वाचे निर्णय घेतले जातात.
या सर्व महत्वाच्या
निर्णयाची सविस्तर माहिती सैनिक कल्याण विभागाद्वारे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक
संघटनांकडे पाठविण्यात आलेली आहे. माजी सैनिक व अवलंबितांनी या बाबत अधिक माहिती
घेण्यासाठी माजी सैनिक संघटनांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.