शनिवार, ७ जुलै, २०१२

शौर्य बालक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


कोल्हापूर  दि. ६ :   भारतीय बालकल्याण परिषदे च्या वतीने दिल्या जाणार्‍या शौर्य बालक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत आवाहन केले आहे. पुरस्काराची नियमावली व विहीत अर्जाचा नमुन तसेच योजनेची माहिती शासनाचे व इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड  वेल्फेअर, नवी दिल्ली यांच्या वेबसाईटवर /.. वर उपलब्ध आहे.
पुरस्कारासाठी अर्ज सादर करताना अर्जासोबत- मुलाचे वय ६ ते १८ वर्ष दरम्यानचे असावे घटनेचा कालावधी १ जुलै, २०११ ते ३० जून २०१२ असावा, पोलीसांचा एफ. आय. आर. ची प्रत, पोलीस डायरी व वृत्तपत्राचे कात्रण इत्यादी सोबत जोडणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत मुलाच्या वयाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडण्यात यावी, प्रस्तावासोबत दोन सक्षम प्राधिकार्‍यांच्या शिफारशी (जिल्हाधिकारी/ जिल्हा पोलीस अधिक्षक व तत्सम) असाण्यात.
१ जुलै २०११ ते ३० जुन २०१२ या कालावधीमध्ये अशी घटना घडलेल्या बालकांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधुन विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन दि. ३० सप्टेंबर २०१२ पुर्वी या कार्यालयाकडे सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.