शनिवार, ७ जुलै, २०१२

बेळगांव पालिका बरखास्तीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार -- उपमुख्यमंत्री अजित पवार


कोल्हापूर  दि. ५ : बेळगांव  महानगरपालिका बरखास्त करण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा घडवून आणू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बेळगांव महानगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले.
श्री. पवार यांचे आज दुपारी दोन वाजता विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी बेळगांवहून आलेल्या शिष्टमंडळाने श्री. पवार यांना निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी कर्नाटक राज्य शासनाने महानगरपालिका बरखास्त करुन अन्याय केला असल्याचे श्री. पवार यांना सांगितले. त्यावर याबाबत मुंबईतील सह्याद्गी अतिथीगृह येथे येत्या रविवारी, दि. ८ जुलै रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच विधीमंडळातील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा घडवून आणू. त्यावेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी यावे, असे श्री. पवार यांनी बेळगांवहून आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांना सांगितले.
दरम्यान श्री. पवार यांचे कोल्हापूरच्या विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मधुकर पिचड होते. कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, महापौर कादंबरी कवाळे, सांगलीचे महापौर इंद्गीस नायकवाडी, आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.