बुधवार, ४ एप्रिल, २०१२

पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ४ : सहकार व संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील शुक्रवार दि. ६ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      शुक्रवार दि. ६ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ८-३० वाजता हेलिकॉप्टरने डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर येथील हेलिपॅडवर आगमन व शासकीय विश्रामगृह, कोल्हापुरकडे प्रयाण. ८-४० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. ९-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे नृसिंहवाडी  येथील अडीअडचणी संदर्भात बैठक. १० वाजता श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थानकडे प्रयाण. १०-४५ वा. ज्योतिबा देवस्थान येथे आगमन व राखीव. ११-३० वाजता कोल्हापुरकडे प्रयाण. दुपारी १२-१५ वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. १२-४५ वाजता डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर येथील हेलिपॅडकडे प्रयाण. १ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने कर्मयोगी स. सा. का. लि. बिजवडी, ता. इंदापूर, जि. पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.