कोल्हापूर दि. ३ : श्री जोतिर्लिंग चैत्र यात्रेच्यावेळी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसराभोवती चेंगराचेंगरी होऊन अनुचित प्रकार घडू नये तसेच सासनकाठ्या यमाई देवीच्या मंदिराकडे उत्तर दरवाज्यातून पायर्यांच्या मार्गाने जाताना एक दिशा मार्गाची आवश्यकता लक्षात घेऊन यात्रेच्या काळात जोतिर्लिंग मंदिराकडे पायी जाणार्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे मार्ग निश्चित करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जोतिबा मंदिरात येणारे भाविक छ. शिवाजी महाराज अर्ध पुतळा मार्गे दक्षिण दरवाज्याने प्रवेश करतील व उत्तर दरवाजामार्गे म्हणजेच सेंट्रल प्लाझा मार्गे बाहेर जातील. श्री. जोतिर्लिंग मंदिराकडे चैत्र यात्रा काळात पायी जाणार्या भाविकांच्या मार्गाचे नियमन दि. ६ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत भाविक उत्तर दरवाजातून मंदिरात येऊन दक्षिण दरवाजातून बाहेर जातील. दुपारी १२ ते रात्रौ यात्रा संपेपर्यंत भाविक दक्षिण दरवाजातून मंदिरात येऊन उत्तर दरवाजाने बाहेर जातील. या व्यवस्थेची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.