मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त निबंध स्पर्धांचे आयोजन

         कोल्हापूर दि. ३ : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०१२ व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विभागीय व राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे. पारितोषकांचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पुस्तक भेट वस्तू, असे आहे. गुणानुक्रमे यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येईल.
      निबंध स्वरचित व मराठी भाषेत असावा. स्पर्धकाने निबंधाचे सुरुवातीस संपूर्ण नाव व पत्ता, दूरध्वनी क्रमांक व गट ठळक अक्षरात नमूद करावा. निबंध पाठविण्याच्या लिफाफ्यावरही माहितीचा सदरील मजकूर लिहावा. निबंध स्वतंत्र पानांवर सुवाच्च स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा.
      गट निहाय विषय व शब्दमर्यादा पुढीलप्रमाणे असून पहिल्या कंसात विभागीय स्तर सर्व गटांसाठी पारितोषिक रक्कम व दुसर्‍या कंसात राज्यस्तर सर्व गटांसाठी पारितोषिक रक्कम दर्शविली आहे. शालेय गट क्र. १ (इयत्ता पाचवी ते दहावी) - सहकारीतेची मूलतत्वे -५०० शब्दापर्यंत, (प्रथम ३००१ रुपये, द्वितीय २००१ रुपये आणि तृतीय १००१ रुपये) (प्रथम ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रुपये आणि तृतीय २००१ रुपये), महाविद्यालयीन गट क्र. २ (इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत) - सहकार चळवळीत तरुणांचा सहभाग व भूमिका - एक हजार शब्दमर्यादा, (प्रथम ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रुपये आणि तृतीय २००१ रुपये), (प्रथम ७००१ रुपये, द्वितीय ५००१ रुपये आणि तृतीय ३००१ रुपये), खुला गट क्र. ३ (सर्वांसाठी खुला) - सहकार संक्रमणाच्या अवस्थेत ? - १५०० शब्दमर्यादा, (प्रथम ७००१ रुपये, द्वितीय ५००१ रुपये आणि तृतीय ३००१ रुपये), (प्रथम ११००१ रुपये, द्वितीय ७००१ रुपये आणि तृतीय ५००१ रुपये).                                     
      स्पर्धकांनी २० एप्रिल २०१२ पर्यंत त्यांचे निबंध बंद लिफाफ्यातून विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, उद्योग भवन, तळ मजला, असेंब्ली रोड, महावीर गार्डनसमोर, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे पाठवावेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १२ मे २०१२ रोजी कोल्हापूर येथे होणार असून ठिकाण नंतर कळविण्यात येणार आहे, असे जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.