कोल्हापूर दि. ७ : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कोल्हापूर यांच्यावतीने मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक प्रशिक्षण कार्यशाळेचे ११ एप्रिल २०१२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुंबईच्या सेव्ह द चिल्ड्रन इंडियाचे समन्वयक प्रवीण कदम मानवी वाहतूक-लघु फिल्मद्वारे लैंगिक शोषणाकरिता होणारी मानवी वाहतूक-संकल्पना याविषयी स्पष्टीकरण करणार आहेत. मुंबईच्या रेस्कू फाऊंडेशनचे अॅड. हरीष भंडारी अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (आयटीपीए) - पिटा तसेच अनैतिक वाहतुकीला बळी पडलेल्या व्यक्तींची सुटका व काळजी आणि संरक्षण याविषयी माहिती देणार आहेत. कोल्हापुरच्या बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश पाटील हे बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २००० (जे.जे. अॅक्ट) आणि (आयटीपीए) यांच्यामधील संबंध व प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी माहिती देणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.