कोल्हापूर दि. ४ : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने संपादित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे या प्रकाशनाचे विमोचन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ५ एप्रिल २०१२ रोजी सकाळी १० वाजता सह्याद्गी अतिथी गृह, मुंबई येथे करण्यात येणार आहे.
पुराभिलेख संचालनालयाच्या मुंबई, पुणे आणि कोल्हापूर कार्यालयात असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांतून निवड केलेली ही छत्रपतींची दुर्मिळ पत्रे १६४६ ते १६७९ या कालावधीतील आहेत. २८ मूळ मोडीपत्रे व त्याचे मराठी लिप्यंतर, तसेच पत्रांचा मराठी व इंग्रजी भाषेतील सारांश असे या प्रकाशनाचे स्वरुप आहे. पेशवा दप्तर, ढेरगे संग्रह, पंत अमात्य बावडा दप्तर, सरदार पाटणकर दप्तर यामधील छत्रपतींची पत्रे या पुस्तकात संपादित करण्यात आली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ कागदपत्रांचा हा अमूल्य ठेवा इतिहास संशोधक, अभ्यासक तसेच सर्वसामान्य जनता यांच्यासाठी उपलब्ध होत असल्याची माहिती पुराभिलेख संचालनालयाच्या संचालिका श्रीमती सुप्रभा अग्रवाल यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.