बुधवार, ४ एप्रिल, २०१२

दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ४ : पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण ७ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ७ एप्रिल २०१२ रोजी अणदूर, ता. तुळजापूरहून दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ३ वाजता गोकुळ कार्यालय परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे गोकुळच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आनंदराव पाटील चुयेकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सपत्नीक गौरव समारंभ व आणंदच्या वाटेवरचा आनंद या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता कोल्हापूरहून अणदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबादकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.