शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

नृसिंहवाडी देवस्थानचा विकास आराखडा तयार करा -पालकमंत्री पाटील यांच्या सूचना

      कोल्हापूर दि. ६ : शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील तीर्थक्षेत्राचा येत्या मे महिना अखेरपर्यंत आराखडा तयार करा अशा सूचनासहकार, संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दिल्या.
      कोल्हापुरातील विश्रामधाम येथे नृसिंहवाडी देवस्थानच्या विकासाबाबत आज बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सूचना दिल्या.
      पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, भाविकांची वाढती संख्या आणि त्यांना लागणार्‍या नागरी सुविधा यांचा व्यापक विचार करुन हा आराखडा तयार करावा. आराखडा तीर्थक्षेत्र आणि पर्यटन असा दोन्ही बाबींचा विचार करणारा असावा. या आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समिती, पर्यटन विकास आणि ग्रामनिधीतून निधी उभा करण्याचा विचार केला जाईल.
      या बैठकीस आमदार महादेवराव महाडिक, नृसिंहवाडीच्या सरपंच राजश्री कांबळे, उपसरपंच आनंदा धनवडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.