कोल्हापूर दि. ४ : राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ गुरुवार दि. ५ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. ५ एप्रिल २०१२ रोजी पुण्याहून सायं. ५ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ६ वाजता उजळाईवाडी येथे करवीरमधील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार कागलकडे प्रयाण व मुक्काम.
शुक्रवार दि. ६ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ ते दुपारी १-३० पर्यंत कागल येथे रामदास घराळ यांच्या समवेत चर्चा व त्यानंतर राखीव. सायं. ५ वाजता मोटारीने इचलकरंजीकडे प्रयाण. ६ वाजता तुष्णूवाला गार्डन, इचलकरंजी येथे आगमन व इचलकरंजी शहर राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थिती. सोयीनुसार कागलकडे प्रयाण व मुक्काम.
शनिवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ७-३० ते १०-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १०-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे शिंदेवाडी येथील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. ११ ते दुपारी २ पर्यंत गडहिंग्लज येथे कार्यकर्त्यांसमवेत चर्चा व राखीव. ३ वाजता कोल्हापूर येथे आनंदराव पाटील चुयेकर यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभास उपस्थिती. सायं. ५ वाजता बाणगे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता कागल निवासस्थानी बाबुराव गुट्टे यांच्याकरिता राखीव.
रविवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ७-३० ते १०-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता कागल येथून मोटारीने कोल्हापुरकडे प्रयाण. ११-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी ३-३० वाजता कागलकडे प्रयाण. सायं. ४ वाजता गैबी चौक, कागल येथे आगमन व कागल तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थिती. ५ वाजता कोल्हापुरकडे प्रयाण. ५-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.