महाड दुर्घटनेतील मयत
श्रीकांत कांबळे यांच्या कुटुबियांना
शासनाच्या मदतीचा धनादेश
पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्त
नृसिंहवाडी, दि. 11 : महाड दुर्घटनेत मृत झालेले एस.टी.चे वाहनचालक श्रीकांत कांबळे आणि त्यांचा मयत मुलगा महेंद्र कांबळे यांच्या हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील घरी भेट देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येकी 4 लाखाच्या शासनाच्या मदतीचा धनादेश त्यांच्या पत्नी कमल कांबळे आणि मुलगा मिलन कांबळे यांच्याकडे सुपूर्त केला. वडील आणि मुलगा यांच्या जाण्याने कांबळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून त्यांच्या दुख:त आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी त्यांच्या सोबत आमदार सुरेश हाळवणकर, आमदार
डॉ. सुजित मिणचेकर, तहसिलदार दिपक शिंदे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पोलिस निरिक्षक
धनंजय जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी मृत श्रीकांत कांबळे यांच्या वयोवृध्द आई हिराबाई शामराव कांबळे, पत्नी कमल कांबळे आणि मुलगा मिलन कांबळे यांची भेट घेऊन त्यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन करुन कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. मिलन कांबळे हा अभियांत्रिकी पदवीधर असून त्याने अनुकंपातत्वाखालील यादीत नाव नोंद करावे. त्याची इच्छा असेल तर महामंडळ अथवा खाजगी संस्थेत नोकरीसाठी मदत केली जाईल. या दुर्घटनेत मृत झालेला महेंद्र कांबळे याला 12 वी सायन्सला 82 टक्के गुण मिळाले असून पुढील शिक्षणासाठीच तो प्रवास करीत होता. ज्या दिवशी श्रीकांत कांबळे आणि त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे यांचे शव सावर्डे येथे आले त्याच वेळी त्यांचे घर पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री पाटील यांना सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी पडलेले घर बांधण्यासाठी तहसिलदारला सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी 92 हजाराचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे व उर्वरित आवश्यक निधी स्वत: उपलब्ध करुन देऊ, असे सांगितले. एसटी महामंडळाचे प्रत्येकी 10 असे 20 लाखाचे धनादेश येत्या आठवड्यात त्यांना मिळतील असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या मंत्री मंडळामध्ये नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामध्ये आतापर्यंत एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर जर त्याचे शव सापडत नसेल तर त्याला 7 वर्षानंतर मृत घोषित केले जात असे. त्यामुळे या दुर्घटनेची ज्या 16 जणांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत त्यांना 2 महिन्यानंतर मृत घोषित करुन सर्व प्रकारच्या देय नुकसान भरपाईची रक्कम कुटुंबियांना देण्यात येईल. एसटी मधील ज्या व्यक्ती मृत झाल्या त्यांना 10 लाख रुपये घोषित करण्यात आले आणि तवेरामधील ज्या व्यक्ती मृत झाल्या त्यांना 4 लाख रुपये एनडीआरफचा निधी आणि 6 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी असे प्रत्येकी त्यांच्याही कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
0 0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.