'माझी कन्या भाग्यश्री'तून मुलगी होणार लखपती
रक्षाबंधन आले
की बाजार पेठा वेगवेगळ्या
रंग, आकाराच्या राख्यांनी भरुन
जातात. पण ही राखी
बांधणारी प्रेमळ बहिण असली
पाहिजे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात
मात्र या निमित्तानं थोड्याशा
आत्मपरिक्षणाची आणि चिंतणाची गरज
निर्माण झाली आहे. पुरोगामी
असणारा हा कोल्हापूर जिल्ह्याचा
देशात मुलींचा जन्मदर कमी
असणाऱ्या 100 जिल्ह्यामंध्ये आणि
राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये समाविष्ठ
आहे.
वंशाला दिवा
मुलगा हवा या वर्षांनुवर्ष
खोलवर रुजलेल्या विचाराने अनेक
प्रकारनं मुलींचा जन्मच नाकारण्यात
आला. स्त्रीयांना स्वातंत्र्य
नाकारणाऱ्या संस्कारानं मुलीचा जन्मही
नाकारायला सुरुवात केली. राज्यातला मुलींचा दर हा 1000 मुलांच्या
मागे 894 इतका आहे. कोल्हापूरातील मुलींचा
दर हा 1000 मुलांच्या मागे
870 इतका आहे. मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी केंद्र शासनानं बेटी बचाओ, बेटी पढाओ
ही योजना सुरु केली.
या योजनेच्या धर्तीवर राज्यातही
मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना
शिक्षण देणे व बालविवाहास
प्रतिबंध करणे, त्यांच्या आरोग्याचा
दर्जा उंचवणे यासाठी माझी
कन्या भाग्यश्री ही योजना
सुरु करण्यात आली आहे.
15 ऑगस्ट
रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांनीही 1 मुलगी अथवा 2 मुलीवर
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या
पालकांचा सत्कार करुन या योजनेला
जिल्ह्यात प्रतिसाद मिळावा यासाठी
आवाहन केले आहे. तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलगी वाचवा..बहिण वाचवा...
हा संदेश फेसबुक, व्टिटर, व्हॉटस्प आदी
सोशल मिडीयांद्वारे लोकांपर्यंत
जास्ती जास्त पोहचवा, असे
आवाहन प्रशासनामार्फत करण्यात
आले आहे.
माझी
कन्या भाग्यश्री या नव्याने
सुरु करण्यात आलेल्या योजनेमध्ये
जानेवारी 2014 पासून लागू करण्यात
आलेले सुकन्या योजना विलिन
करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत
राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात
जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे लाभ
कायम ठेवून त्या व्यतिरिक्त
वयाच्या 18 वर्षापर्यंत अधिकचे
लाभ देण्यात येतील. मुलीच्या
जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी
एकूंत्या एका मुलीवर मातेने
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली
असल्यास 5 हजार रुपये तर दुसऱ्या
मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
केली असल्यास 2500 रुपये देण्यात
येतील. प्रधानमंत्री
जनधन योजनेंतर्गत मुलगी
व तीची आई यांच्या नावे
संयुक्त बचत खात्यांतर्गत 1 लाख
रुपयांचा अपघात विमा व 5000 रुपये
प्रयंताचा ओव्हर ड्राफ्ट यांचा
लाभ मिळेल. मुलीच्या नावावर
शासनामार्फत एलआयसीकडे 21200 रुपयांचा विमा उतरविण्यात
येईल. मुलीचे वय 18 वर्ष
पुर्ण झाल्यावर 1 लाख रुपये
विम्याची रक्कम देण्यात येईल.
याच रक्कमेतून मुलीच्या कमवत्या
पालकांचा प्रती वर्षी 100 रुपये
विमा भरला जाईल. अपघात
अथवा मृत्यू झाल्यास अनुक्रमे
75000
व 30000 देण्यात येईल.
मुलींच्या पालन
पोषणासाठी व त्यांच्या आरोग्याचा
दर्जा उंचवावा यासाठी मुलीगी
5 वर्षाची
होईपर्यंत प्रती वर्षी 2000 रुपये
याप्रमाणे 10 हजार रुपये दोन्ही
मुली असल्यास प्रत्येकी एक हजार
रुपये व पाच वर्षापर्यंत
एकूण 10 हजार रुपये देण्यात
येतील. प्राथमिक
शाळेत प्रवेश घेताना प्रतीवर्षी
अडीच हजार रुपये असे
पहिली ते पाचवी पर्यंत
एकूण 12500 रुपये तर दोन्ही मुली
असल्यास प्रत्येकी 1500 प्रमाणे एकूण
15 हजार
रुपये, माध्यमिक शिक्षणासाठी इयत्ता
6 वी ते 12 वी पर्यंत
प्रतीवर्षी 3 हजार रुपये असे
एकूण 21 हजार तर दोन्ही
मुलींना प्रत्येकी 2 हजार असे
एकूण 22 हजार रुपये देण्यात येतील.
समाजातील अनेक
कुटुंबांमध्ये सासू सासऱ्यांकडून मुलगाच
पाहिजे यासाठी दबाव टाकला
जातो. ही मानसिकता बदलण्यासाठी
या योजनेत पहिल्या मुलीनंतर
मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
केली असल्यास आजी आजोबालाही
प्रोत्साहनपर भेट देण्यात येईल.
यामध्ये 5 हजार रुपयाचे सोन्याचे
नाणे व प्रमाणपत्राचा समावेश
असेल. तसेच महिला व बाल
विकासमंत्री यांच्या हस्ते क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन,
राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन,
राष्ट्रीय बालिका दिन, महिला
दिनाच्या अशा प्रसंगी सासू
सासऱ्यांचा सत्कार करण्यात येईल.
या योजनेंतर्गत
समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी
ज्या गावांमध्ये मुलामुलींचे लिंगगुणोत्तर
1000
पेक्षा जास्त असेल अशा
गावास 5 लाखाचे पारितोषिक देऊन
गौरविण्यात येईल. तसेच सदरची
रक्कम ग्रामपंचयतीने गावातील
मुलींच्या विकासासाठी खर्च करणे
बंधनकारक आहे.
शासकीय पातळीवरुन होणाऱ्या
प्रयत्नांना समाजाची साथ मिळाल्यास
मुला-मुलगी लिंगगुणोत्तर
सुधारुन स्त्रीयांकडे पाहण्याच्या
सामाजिक दृष्टीकोनात बदल
होईल. स्त्रीभ्रुण हत्या
थांबतील. गर्भातच मुलींची हत्या
होणे थांबेल आणि समाज
खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि
सुदृढ होईल आणि मानसिक
दृष्ट्या सुदृढ होईल.
वर्षा पाटोळे
जिल्हा माहिती
अधिकारी
कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.