सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६




कोल्हापूर बैथुल माल कमेटी
देशाला सामाजिक सलोख्याचे कार्यक्रम आवश्यक
                पालकमंत्री चंद्रकांत पाटील

          कोल्हापूर, दि. 15 : भारतासारख्या सर्वधर्म समभावाच्या देशामध्ये अनेक प्रकारची जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सामाजिक सलोख्याचे कार्यक्रम युवकांनी राबवावेत आणि जाती-धर्मांमध्ये बंधुभाव निर्माण करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
                बिंदु चौकात आयोजित बैथुल माल कमेटी आणि सलोखामंच्यावतीने आयोजित 'आम्ही भारती एकता' रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, खासदार धनंजय महाडिक, उपमहापौर शमा मुल्ला, आमदार राजेश क्षिरसागर, महापालिकेचे सर्व सदस्य, पदाधिकरी उपस्थित होते.
                पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजर्षी शाहूच्या भुमित सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांशी  मिळून मिसळून राहतात हा आदर्श संपूर्ण देशांने घेण्यासारखा असल्याचे सांगितले.
                खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरची जनता ही कायमपणे विकासात्मक भुमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी राहत आली आहे, असे सांगून आपण संसदेचा सदस्य या नात्याने कोल्हापूरचे अनेक प्रश्न संसदेत मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही कोल्हापूरच्या जनतेने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थकरण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले.
                आमदार राजेश क्षिरसागर यांनी एकता रॅलीसारखे उपक्रम कोल्हापूरता साजरे होणे हे कोल्हापूरच्या सर्वधर्म समभावाचे प्रतीक असल्याचे सांगून स्वतंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात सर्व जाती धर्माचे लोक उत्साहाने सहभागी होतात. कोल्हापूरातही ही परंपरा अखंड ठेवण्यामध्ये मुस्लीम समाजाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.

0 0 0 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.