गणराया ऍ़वॉर्ड 2015 चे तुकाराम
माळी तालिम मंडळाला सर्वसाधारण
विजेतेपद
कोल्हापूर, दि.
26 : जे सण परंपरागत, ऐतिहासिक, सामाजिक
सुधारणांच्या हेतुने सुरु केले
आहेत आज त्यांचा खरा
उद्देशच लोप पावला आहे.
माणसाच्या मनात असणारी भक्ती
ही समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगात
यावी ती विकासात रुपांतरी
व्हावी, यासाठी गणेश मंडळांनी विधायक
उपक्रम राबवावेत, आपल्या भौगोलिक
क्षेत्रात कोणी शाळा वंचित, अन्न
वंचित असू नये याची
काळजी घ्यावी, दुख: दैन्य
हरण करण्याची जबाबदारी गणेश
मंडळांनी उचलावी अशी अपेक्षा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी
व्यक्त केली.
कोल्हापूर
जिल्हा पोलीस दल कोल्हापूर
शहर अंतर्गत गणराया ऍ़वॉर्ड
2015 बक्षिस
वितरण समारंभ केशवराव भोसले
नाट्यगृहात झाला. यावेळी श्रीमंत
छत्रपती शाहू महाराज, महापौर अश्विनी
रामाणे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष
पोलीस महानिरीक्षक विश्वास
नांगरे पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक
प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
कुणाल खेमणार, अतिरिक्त पोलीस
अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, करवीरचे प्रांताधिकारी
प्रशांत पाटील यांची प्रमुख
उपस्थिती होती. या कार्यक्रमात
गणराया ऍ़वॉर्ड 2015 चे सर्वसाधारण
विजेतेपद तुकाराम माळी तालिम
मंडळ, मंगळवार पेठ, यांना पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रदान
करण्यात आले.
उत्सवकाळातील
डॉल्बीच्या वापराबाबत उच्च न्यायालयाचे
निर्देश आहेत, असे सांगून
पालकमंत्री पाटील म्हणाले, निर्देशांचे उल्लंघन
होऊ नये याची काळजी
सर्व मंडळांनी घ्यावी. तसेच
डॉल्बी मुक्त वातावरणात गणेशोत्सव
उत्साहात व शांततेत साजरे
करावेत. स्वराज्य माझा जन्म
सिध्द हक्क आहे आणि
तो मी मिळवणारच या लोकमान्य
बाल गंगाधर टिळक यांच्या
घोषणेला 100 वर्ष पुर्ण झाली आहेत.
त्यामुळे यावर्षी लोकमान्य टिळक
आणि त्यांचे कार्य या विषयी
समाजात प्रबोधन करावे, असे पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
उत्सवकाळात
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
पोलीसांना सहकार्य करा, असे सांगून
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी
पोलीसांचा कायद्याचा धाक कमी
झाल्यास आराजकात निर्माण होईल.
त्यामुळे कायदे मोडणाऱ्यांवर कठोर
कारवाई केली जाईल, असे सांगितले.
यावेळी त्यांनी गणेश मंडळांच्या
पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचाही सहभाग असावा
आणि महिलांनी सहभागी व्हावे
असे वातारणही असावे अशी
अपेक्षा व्यक्त केली.
श्रीमंत छत्रपती
शाहू महाराज यांनी गणराया
मिरवणूक शांततेत पार पाडावी, असे
सांगून डॉल्बी मुक्त गणेशोत्सव
साजरा करण्याचे आवाहन यावेळी
त्यांनी केले.
महापौर
अश्विनी रामाणे यांनी डॉल्बी
मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे
आवाहन करुन कोल्हापूर हे कलांचे
शहर आहे. त्यामुळे उत्सवकाळात
लोककला सादर केल्या जाव्यात, त्यांना
प्रोत्साहन द्यावे, असे ही त्यांनी
यावेळी सांगितले.
कोल्हापूर
परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
विश्वास नांगरे-पाटील यांनी
रचनात्मक आणि सकारात्मक पध्दतीने
डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा
करण्याचे आवाहन करुन तरुणाची
उर्जा विधायक कामासाठी लावली
जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनाच्या
ज्या उदात्तहेतुने गणेशोत्सवाची
सुरुवात केली तो हेतु
आज मागे पडला असून
डॉल्बीच्या आहारी आजची तरुण
मंडळी जात आहेत. डॉल्बी
मधून 120, 130 डीसीबलचे आवाज निर्माण
होतात. सामान्या माणूस ते सहन
करुन शकत नाही. त्यामुळे
आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.
तसेच महाद्वार आणि परिसरात
अनेक मोडकळीस आलेल्या इमारती
आहेत त्यांनाही या डॉल्बीच्या
आवाजाने धोका पोहचू शकतो
त्यामुळे उत्सव हा डॉल्बी
मुक्त वातारणातच झाला पाहिजे, असे
स्पष्ट केले. पण त्याचवेळी
दंडूकीच्या जोरावर कारवाई न करता
प्रबोधनात्मक मार्गाने बदल घडवून
आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल
असेही स्पष्ट केले.
पोलीस
अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी
डॉल्बी मुक्त गणेशोत्सव ही लोक
चळवळ व्हावी, अशी अपेक्षा
व्यक्त करुन या काळात
बंदोबस्थाच्या सर्व उपाययोजना करण्यात
आल्या असून सुरक्षा व्यवस्था
चोख ठेवण्यात येईल, असे स्पष्ट
केले. उत्सवकाळात महिलांना सहभागी
होता यावे, त्यांची छेडछाड
होऊ नये, त्यांना निर्भय
वाटावे यासाठी निर्भया पथक
कार्यरत राहील, असेही सांगितले.
यावेळी उदय
गायकवाड, धनंजय कलगावकर, अनिल चौगुले, अशोक
रोकडे, अरुण पाटील या पंच
समितीचा सत्कार करण्यात आला.
गणराया ऍ़वॉर्ड सन 2015 स्पर्धा विजेते
सर्वसाधारण विजेतेपद-
तुकाराम माळी तालीम मंडळ, मंगळवार पेठ,
शिस्तबध्द मिरणूक-प्रथम क्रमांक-लेटेस्ट तरुण
मंडळ, मंगळवार पेठ आणि तुकाराम
माळी तालीम मंडळ, मंगळवार पेठ
उत्कृष्ट
गणेश मुर्ती- प्रथम
क्रमांक- मृत्युजण मित्र मंडळ, ज्ञानेश्वर
मंडप शनिवार पेठ, द्वितीय क्रमांक-
एकदंती गणेश मित्र मंडळ, घाटी
दरवाज्याजवळ, तृतीय क्रमांक- न्यु
अमर मित्र मंडळ, नष्टे गल्ली
शनिवार पेठ, उत्तेजनार्थ-आत्मविश्वास मित्र
मंडळ, द्रविड बोळ, महाद्वाररोड, सिध्दीविनायक मित्र
मंडळ,शिवाजी उद्यम नगर.
उत्कृष्ट देखावा
(तांत्रिक)-प्रथम क्रमांक-जय शिवराय मित्र मंडळ, उद्यम
नगर,
द्वितीय क्रमांक-शाहुपूरी युवक
मित्र मंडळ, व्यापारी पेठ, शाहुपूरी, तृतीय
क्रमांक-पाच बंगला मित्र मंडळ, शाहुपूरी
चौथी गल्ली, उत्तेजनार्थ- नंदी
तरुण मंडळ, रंकाळा टॉवर.
उत्कृष्ट देखावा
(सजिव)
प्रथम क्रमांक-छ.शिवाजीराजे तरुण
मंडळ, मेनरोड कसबा बावडा आणि
मनोरंजन तरुण मंडळ वाडकर
गल्ली, द्वितीय क्रमांक-कॅप्टन उमेश
कांदेकर युवा मंच, रंकाळा टॉवर.
तृतीय क्रमांक डांगे गल्ली
तरुण मंडळ, जुना बुधवार, शिपुगडे
तालिम मंडळ, केसापूर पेठ,
विधायक
उपक्रम- प्रथम क्रमांक-प्रिन्स क्लब, मंगळवार
पेठ,
द्वितीय क्रमांक- जय भवानी
तालिम मंडळ, माळ गल्ली
कसबा बावडा, तृतीय क्रमांक-सम्राट मित्र मंडळ, चव्हाण गल्ली, कसबा
बावडा.
समाज प्रबोधन-प्रथम क्रमांक-भारतीवीर मित्र मंडळ,चौगले गल्ली, कसबा
बावडा, द्वितीय क्रमांक सोल्जर्स तरुण
मंडळ, तोरस्कर चौक, तृतीय क्रमांक-हायकमांड फ्रेंडस सर्कल, जुना बुधवार
पेठ,
उत्तेजनार्थ क्रांतीवीर राजगुरु, जुना बुधवार
पेठ आणि स्वयंभु गणेश
मित्र मंडळ, लक्ष्मीपुरी कोंडाओळ
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.