भाविकांच्या अपुर्व उत्साहात
गणेशवाडीत, औरवाड कन्यागत सोहळा
नृसिंहवाडी
दि. 12: भाविकांच्या
अपुर्व उत्साहात औरवाड व गणेशवाडीत कन्यागत महापर्वकाळानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनी
सोहळा संपन्न झाला. श्रीदत्त अमरेश्वर मंदिरातून रात्री पालखीचे प्रस्थान झाले. सकाळी
सुर्योदयाच्यावेळी श्रीअमरेश्वर तीर्थस्नानादी सोहळा संपन्न झाला. गणेशवाडी घाटावरही
भाविकांनी पहाटेपासूनच पर्वणी काळातील स्नानादी विधी केले.
श्रीक्षेत्र गणेशवाडी येथे कृष्णा नदी
पश्चिम वाहिनी असून या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे. येथे कन्यागत सोहळ्यानिमित्त
रात्रीपासूनच पर्वकाळ सुरु होण्याबरोबरच वाद्य संगीत व फटाक्यांचे आतषबाजीने वैदीक
व भक्तगणांच्या उपस्थितीत श्रीगंगेचे स्वागत
करण्यात आले. आज सुर्योदयापूर्वी गावातील सर्व देवी देवतांच्या प्रतीमा पालखीतून मिरवणूकीने
कृष्णातीरावर जाऊन गंगेचे स्वागत करुन पर्वकाळचे स्नानविधी संपन्न झाला. परंपरेनुसार
पुण्यहवाचन गंगापुजनादी विधी व यजमानाच्या हस्ते पुजा होवून गंगेचे विश्वशांतीकरीता
ग्रामपरिक्रमा पालखी मार्गावरुन मार्गस्थ होऊन पुरातन श्री गणेश मंदिराच्या नगारखान्यात विधीवत स्थापना, पुजा, मंत्रपटन, आरती होऊन प्रसाद
वाटप झाले.
कन्यागत महापर्वकाळ महोत्सवानिमित्त अमरापूर-औरवाड
येथे महोत्सव समितीच्यावतीने श्रीदत्त अरमेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
केले होते. श्रीक्षेत्र अमरापूर (औरवाड) येथील श्रीकृष्णावेणीच्या पश्चिमवाहिनी स्थानातील
शुक्लतीर्थ या स्थानावर श्रीकन्यागत महापर्वाच्या
गंगा स्नानाचा सोहळा संपन्न झाला.या निमित्त
श्रींची सुशोभीत पालखी, श्रीदत्त अमरेश्वर मंदिरातून निघून दुतर्फा दिप, धुप, रस्त्यावरील रांगोळ्यांची
शोभा, तोरणे, गुढ्या, पताका, टाळमृदुंगांच्या नादात नामस्मरणाचा मंगलघोष करणारे भक्तजन, गुलाल, अबिर, बुक्का या मंगल द्रव्यांची
उधळण करीत, जागोजागी सुंदर कमानीतून कापडी मांडव, विद्युत रोष्णाईत घरोघरच्या भक्तांचे
वंदन व सुवासिनींनी औक्षण करुन तेथे धार्मिक कार्यक्रम व नंतर श्रींचे तीर्थस्नान झाले.
त्यानंतर पालखी पुन्हा श्री दत्त अमरेश्वर मंदिरात आल्यावर श्रींची महापूजा झाली. यात्रेनिमित्त
'अन्नछत्र' मुक्तद्वार अन्नदानातून श्रींचा महाप्रसाद देणेत आला.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.