गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६




शुक्लतीर्थ घाट परिसराची
पालकमंत्र्यांकडून पाहणी
 नृसिंहवाडी,दि. 11 : कन्यागत महापर्व सोहळ्या निमित्त श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्लतीर्थ घाटाची व परिसराची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट देऊन पाहणी केली. तसेच निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचीही पाहणी केली.
 त्यांच्या समवेत आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर,  जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, श्री नृसिंहसरस्वती दत्तगुरु देवस्थानचे अध्यक्ष राहूल पुजारी, सचिव संजय पुजारी  तसेच सरंपच अरुंधती जगदाळे तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीला अद्यापही पुरपरिस्थिती निर्माण झाली असून शुक्लतीर्थ घाटही पाण्याखाली गेला आहे. या परिसरात श्रींची पालखी येत असून शुक्लतीर्थ उद्या सकाळी 6 वाजून 21 मिनिटांने दत्तत्रयांचे कृष्णागंगा स्नान थाटात संपन्न होणार आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडवा यासाठी प्रशासनाने आणि देवस्थान समितीने केलेल्या उपाययोजना आणि घेतलेली दक्षता यांचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.

0 0 0 0 0 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.