कोल्हापूर, दि. 26 : कागल एमआयडीसी
येथील किर्लोस्कर ऑईल इंजिन्स
लि.च्या विविध प्रकल्पांना राज्याचे
महसूल मंत्री व कोल्हापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी भेट देवून पाहणी
केली. यावेळी किर्लोस्कर ग्रुपच्या पॉवर टिलर
प्लँटचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी उद्घाटन केले.
किर्लोस्कर ऑईल
इंजिन्स लि. च्या विविध
प्रकल्पांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या भेटीप्रसंगी किर्लोस्कर
ऑईल इंजिन्स लि. चे संयुक्त
व्यवस्थापकीय संचालक आर. आर.
देशपांडे, कागल प्लँटचे प्रमुख प्रकाश
राव,
उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष चंद्रहास
रानडे, विभागाचे मुख्य उपाध्यक्ष कृष्णा
गावडे, पुरवठा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक
आनंद गजेंद्रगडकर, पॉवर टिलर
प्लँटचे विभागीय व्यवस्थापक सुनिल
माने, मुख्य उप विभागीय व्यवस्थापक
राहूल पवार यांची प्रमुख
उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी किर्लोस्कर ऑईल
इंजिन्सच्या विविध उत्पादनांची तसेच
विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर
माहिती घेतली. यावेळी त्यांनी
पॉवर टिलर प्लँटचे उद्घाटन
केले. तसेच वृक्षारोपण करुन
पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी संयुक्त
व्यवस्थापकीय संचालक आर. आर.
देशपांडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत
पाटील यांचे स्वागत करुन
किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या विविध
उत्पादनांची सविस्तर माहिती दिली.
यामध्ये त्यांनी किर्लोस्कर डिझेल
इंजिन्स लि. ला 2009 मध्ये आयएसओ
मानांकन तसेच सुवर्णपदक मिळाल्याचे
सांगून, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध
उत्पादनांची सविस्तर माहिती दिली.
शास्त्र शाखेच्या पदवीधर तरुणांची
कंपनीत भरती करुन गुरुकुल
पध्दतीने उमेदवारांना प्रशिक्षीत
करुन कमी कष्टात दर्जेदार
उत्पादने, रोजगार निर्मितीबरोबरच वितरकां
सोबत घेऊन काम करण्याची
किर्लोस्कर उद्योग समुहाची पध्दत, सामाजिक
बांधिलकी, ग्रीन गोल्ड प्रमाणपत्र, वीज बचतीचे
विविध उपक्रम, करियर मार्गदर्शन,
आंतरराष्ट्रीय वसुधा फिल्म फेस्टिवल, शाळांमध्ये
घेण्यात येणारे कार्यक्रम, दरवर्षी घेण्यात
येणारे नाविण्यपूर्ण उपक्रम, सांडपाण्यावर
प्रक्रीया करणारे प्रकल्प, सोलर एनर्जी, कच्च्या
मालापासून पॅकींगपर्यंतची अत्याधुनिक
प्रक्रीया, सौर प्लॅट, बायोगॅस प्लॅट, आदि
बाबींची पाहणी करुन पालकमंत्री
चंद्रकांत पाटील समाधान व्यक्त
केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.