कोल्हापूर विमानतळावर
विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे
यांच्यासह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
उत्स्फुर्त स्वागत
कोल्हापूर, दि.
12 : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर आज सकाळी 10.00 वा. आगमन झाले. यावेळी त्यांच्या समवेत कृषि व फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर, यांचेही आगमन झाले. कोल्हापूर विमानतळावर विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
त्यांच्या समवेत आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडीक, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, नूतन अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, वनसंरक्षक श्री. राव, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सांगलीचे पृथ्वीराज देशमुख, कृषी सहसंचालक नारायण शिसोदे, ऍ़ड. संपतराव पवार, संदीप देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागचे आर. एस. पाटील यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.